तब्बल ४७५० महिलांनी घेतला लाभ...
विले पार्ले ( पूर्व ) बामणवाडा येथे एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था तर्फे या संस्थेचे संस्थापक श्री. संजय (भाऊ)भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अनेक उपक्रम सतत राबविले जात असतात.
या संस्थेतर्फे असाच एक कार्यक्रम म्हणजे वॉर्ड क्र. ८३ बामणवाडा विले-पार्ले येथील निराधार आणि विधवा महिला दिवाळीनिमित्त प्रत्येकी ५०० रुपये देण्यात आले याचा फायदा ४७५० महिलानि घेतला असे संजय ( भाऊ ) भोकरे यांची भेट घेतली असताना सांगण्यात आले.
लोकांकडून असे विचार मांडले गेले आहेत की असाच समाज सेवक आम्हाला हवा आहे आणि असाच समाजसेवक वार्ड क्रमांक ८३ मध्ये नगरसेवक म्हणून असावा अशी लोकांनी प्रतिक्रया व्यक्त केली.या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे श्री.राजेश पवार, श्री.विनोद जाधव, श्री सुशिल मोहिते , नायडू , अनिताताई यांनी विशेष मेहनत घेतली.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.