राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ९४७ मध्येही कोणतीही भूमिका घेतली नाही. आता एप्स्टीन फाईल्समध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतरसुद्धा आरएसएसने कोणतीच भूमिका घेतली नाही. ज्याला चारित्र्य नाही असा प्रांत्प्रधान तुम्हाला चालतो का? अशा अनेक प्रश्नांचा रा. स्व. संघाला आरएसएसला जाब विचारण्यासाठी आम्ही २३ मार्च या दिवशी मोर्चा काढणार आहोत, असं तारखेला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवार दि. १३ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मी
मध्यमवर्गीयांना आवाहन करतो की, जे लोण आता आपल्याला भारतात येताना दिसत नाही ते
भारतात आपल्याला दिसेल. यासाठी आपण सर्वांनी भूमिका घ्यावी. समझोता केलेल्या
पंतप्रधानाला बाजूला सारलं पाहिजे. त्यांना राजीनामा द्यायला लावलं पाहिजे. यासाठी
आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा भूमिका घ्यायला लावू. यासाठी आम्ही नागपूरमध्ये
२३ मार्च रोजी आंदोलन करणार आहोत. यात सर्व समाजाने सामील व्हावं असं मी सर्वांना
आवाहन करतो.
आज आपल्याला जो इंधनाचा
तुटवडा पाहायला मिळत आहे तो भारताने अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधात भूमिका
घेतली नाही म्हणून निर्माण झाला आहे. कदाचित आमचा मोर्चा निघेपर्यंत बँकांमधली परिस्थिती
सुद्धा बिघडलेली असेल असं सध्याचं चित्र आहे. हे जर सर्व थांबवायचं असेल तर समझोता
करणारे, अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणारे नरेंद्र मोदी यांना या पदावरून हटवलं
पाहिजे तरच ही परिस्थिती सामान्य होऊ शकेल, असंही अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अॅड. प्रकाश आंबेडकर
यांनी मध्यमवर्गाला दिला भविष्यातील घातक इशारा

0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.