नोकरदार महिलांच्या गर्भपातावरील क्वेस्ट ग्लोबलचा 'कॉस्ट ऑफ सायलेन्स' अहवाल प्रसिद्ध
मुंबई, प्रतिनिधी : 9 जून, 2026 :
“बऱ्याच काळापासून गर्भपात ही बाब कामाच्या
ठिकाणी दुर्लक्षित राहिली आहे, ज्यामुळे अनेक महिलांना आपले काम सुरू ठेवत हे दुःख
मुकाट्याने सहन करावे लागते. आमच्या संशोधनानुसार, या मौनामुळे उत्पादकता, आत्मविश्वास, नोकरी टिकवून ठेवणे आणि करिअर यावर मोठ्या प्रमाणात परिणाम
होतो. हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही; तर हा कर्मचारी वर्गाचाही प्रश्न आहे,” असे प्रतिपादन क्वेस्ट ग्लोबलचे सह-संस्थापक आणि सीईओ, अजित प्रभू यांनी
केले. YouGov च्या मूळ संशोधनाच्या आधारावर,
क्वेस्ट ग्लोबलने आपला 'कॉस्ट ऑफ सायलेन्स'
अहवाल आज प्रसिद्ध केला. याशिवाय जगातील सर्वात मोठ्या स्वतंत्र आणि केवळ
अभियांत्रिकी सेवा पुरवणाऱ्या क्वेस्ट ग्लोबल या कंपनीने कामाच्या ठिकाणी
गर्भपाताच्या विषयावर चर्चा घडवून आणण्यावर 'ब्रेक द सायलेन्स' ही पहिलीच राष्ट्रीय मोहीम आज सुरू केली आहे. या
उपक्रमाच्या शुभारंभावेळी अजित प्रभू बोलत
होते. “भारतातील सर्व सीईओ आणि
व्यावसायिक नेत्यांना मी आवाहन करतो की, त्यांनी गर्भपाताला कामाच्या ठिकाणावरील वास्तव म्हणून
स्वीकारण्यासाठी आमच्यासोबत यावे. चला, अशी कार्यस्थळे निर्माण करू या जिथे प्रत्येकाला सुरक्षित, आधार मिळेल आणि सक्षम वाटेल,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भारतात दरवर्षी लाखो
महिलांना गर्भपाताचा त्रास सहन करावा लागतो. नोकरी
करत असतानाच अनेकींना हा त्रास होतो. तरीही, बहुतांश महिलांच्या गर्भपाताकडे कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष
केले जाते. अनेकदा हा त्रास मुकाट्याने सहन केला जातो. त्यातही लोकांच्या टीकेचा
विषय होऊ नये किंवा करिअरवर होणाऱ्या परिणामाची भीती सोबत असते. कामाच्या ठिकाणी
गर्भपाताच्या विषयावर चर्चा घडवून आणण्यावर 'ब्रेक द सायलेन्स' ही मोहीम लक्ष केंद्रित करते. क्वेस्ट ग्लोबलने YouGov
च्या सहकार्याने केलेल्या मूळ संशोधनावर ही मोहीम आधारित
आहे. गर्भपात ही कर्मचाऱ्यांची एक गंभीर समस्या म्हणून समोर येते. कारण, याचे उत्पादकता, कर्मचारी टिकवून ठेवणे, समावेशकता आणि दीर्घकालीन करिअर प्रगतीवर जाणवण्याजोगे
परिणाम होतात.
देशभरातील २५ ते ३९ वयोगटातील २००० महिला आणि २०० पुरुषांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यात स्टेम, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कनिष्ठ, मध्यम, वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱ्यांचा, तसेच विविध टीम्सचे नेतृत्व करणाऱ्या पुरुष व्यवस्थापकांचा
समावेश होता.
अभ्यासात असे दिसून आले
की,
बहुतांश महिला मूकपणे हा त्रास सहन करत राहतात; पण हे त्या स्वतःच्या इच्छेने करत नाहीत तर भीतीपोटी करतात.
गर्भपात झाल्याचे सांगितल्यास नोकरी जाण्याची किंवा करिअरवर विपरीत परिणाम
होण्याची भीती सुमारे ७.८ कोटी महिलांना वाटते, तर ८ कोटी महिला इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियेच्या किंवा
टीकेच्या भीतीमुळे गप्प राहतात. याव्यतिरिक्त, गर्भपातानंतर मालकांकडून योग्य आधार न मिळाल्यास ७ कोटी
भारतीय महिला आपली नोकरी सोडण्याचा विचार करू शकतात. दर ४ पैकी ३ महिलांनी
असे म्हटले की, गर्भपातामुळे
त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, शिवाय गप्प राहिल्यामुळे त्यांच्या कामावरही त्याचा परिणाम
होतो.
क्वेस्ट ग्लोबलने YourDOST
सोबत भागीदारी करून एक संपूर्ण सहाय्यक व्यवस्था सुरू केली
आहे,
ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: गर्भपाताच्या समस्येमध्ये
विशेष प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांद्वारे गोपनीय आणि तज्ज्ञ साहाय्य देण्यासाठी 24-तासांची हेल्पलाइन, समवयस्कांसाठी सहाय्य गट, एचआर व्यावसायिक आणि व्यवस्थापकांना संवेदनशील विषय
हाताळण्यासाठी प्रशिक्षण साहित्य, जागरूकता निर्माण करणारे वेबिनार आणि डाउनलोड करण्यायोग्य
कार्यस्थळ साधने. याचा प्रभाव वाढवण्यासाठी, YourDOST च्या या गर्भपात सहाय्य सेवा क्वेस्ट ग्लोबल भारतातील
प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक संस्थेपर्यंत विनामूल्य पोहोचवत आहे. या साधनांची
उपलब्धता वाढवल्यामुळे, लोकांना आणि संस्थांना एक नियोजनबद्ध आणि सहज उपलब्ध होणारे सहाय्य मिळेल.
ही कृती करण्यामागील
व्यावसायिक औचित्य स्पष्ट आहे. जेव्हा मालक खऱ्या अर्थाने आधार देणारे वातावरण
निर्माण करतात, तेव्हा
४८ टक्के महिलांना
आपले म्हणणे मोकळेपणाने मांडता येते; तसेच, गर्भपातासारख्या कठीण प्रसंगी आधार देणाऱ्या मालकाबद्दल ४३ टक्के महिलांच्या
मनात आदर निर्माण होते. कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे, सर्वसमावेशकता साधणे आणि सक्षम मनुष्यबळ (टॅलेंट पाइपलाइन)
टिकवून ते बळकट करणे यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संस्थांसाठी,
'मौन तोडण्याचा'
(Break the Silence) संकल्प करणे ही
केवळ एक घोषणा नसून एक धोरणात्मक व्यावसायिक निर्णयही ठरतो. किंबहुना, गर्भपाताच्या काळात आधार देणारी कंपनी हे ४५ टक्के महिलांसाठी
इतरांना आपल्या मालकाची शिफारस करण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते.
"प्रत्येक
आकडेवारीमागे एखादी स्त्री असते, जी एखादे अदृश्य ओझे पेलत असतानाही जिद्दीने पुढे जाण्याचा
प्रयत्न करत असते. अशा वेळी मिळणारा आधार ही काही साधी गोष्ट नाही; तो आधार तिला त्या संस्थेचा एक भाग वाटण्यास, तिथे टिकून राहण्यास आणि करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करू
शकतो. जर अधिक स्त्रियांनी नोकरीत टिकून राहावे आणि नेतृत्वाची धुरा सांभाळावी असे
आपल्याला वाटत असेल, तर स्त्रियांना सर्वाधिक एकटेपणा वाटणाऱ्या प्रसंगांकडे आपल्याला लक्ष द्यावे
लागेल. गर्भपात हा असाच एक कठीण प्रसंग आहे आणि अशा वेळी कामाच्या ठिकाणाहून
मिळणारा आधार खूप मोठा फरक घडवून आणू शकतो," असे प्रतिपादन 'क्वेस्ट ग्लोबल'च्या चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर युमी क्लेव्हेंजर-ली यांनी केले.
"हे
संशोधन अशा एका गोष्टीवर प्रकाश टाकते जी आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आली आहे, पण जिच्याबाबत आपण क्वचितच विचार करतो. स्त्रिया हे दुःख
एकट्याने पेलतात, त्या स्थितीतही आपले काम करत राहतात आणि क्वचितच मदत मागतात; कारण तसे केल्यास त्यांना व्यावसायिक पातळीवर त्याची मोठी
किंमत मोजावी लागू शकते. केवळ एखाद्या धोरणामुळे यात बदल होत नाही. खरा बदल
तेव्हाच घडतो जेव्हा कामाच्या ठिकाणी मौन बाळगण्याची गरज वाटत नाही,"
असे क्वेस्ट ग्लोबलच्या 'पीपल अँड कल्चर' विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष सोनिया कुट्टी म्हणाल्या.
काही समस्या अशा असतात
ज्यांचे स्वरूप एखादी व्यक्ती किंवा संस्था एकटी हाताळू शकत नाही. म्हणूनच, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही इतर कंपन्यांनाही सोबत
घेत आहोत. गर्भपाताची दुर्घटना कोणत्याही क्षेत्रावर, कार्यालयावर किंवा टीमवर परिणाम करून जाते. जसजशा अधिक
संस्था याची दखल घेतील, तसतसे 'ब्रेक
द सायलेन्स' हा
केवळ एक उपक्रम न राहता एक लोकचळवळ बनू लागेल. जितक्या जास्त कंपन्या यात सामील
होतील,
तितका हा पाठिंबा अधिक बळकट होईल आणि आम्हाला विश्वास आहे
की,
यामुळे संपूर्ण भारतात एक सकारात्मक बदल घडून येऊ शकेल.
“आज आम्ही या उपक्रमाची
सुरुवात केली आहे आणि पाच संस्था आधीच या चळवळीत सहभागी झाल्या आहेत. यात भारत
सीरम अँड व्हॅक्सिन्स, कोने (Kone),
अमरा राजा, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज आणि इंडियन
फार्मास्युटिकल अलायन्स यांचा समावेश आहे. आम्ही सर्वजण मिळून गर्भपाताशी संबंधित
विषयावरील मौन तोडत आहोत आणि अधिक समजून घेणारी तसेच आधार देणारी कार्यस्थळे
निर्माण करत आहोत,” असेही यावेळी सांगण्यात आले.
भारतातील प्रत्येक
संस्थेला,
मग ती कोणत्याही उद्योगातील असो किंवा कोणत्याही आकाराचा असो, यात सहभागी
होण्यासाठी www.breakthesilence.in या वेबसाईट वर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात
आले आहे.



0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.