अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा...

सुपर थर्टी मधलं आनंद सरांच्या म्हणजेच हृतिक रोशनच्या तोंडचं हे वाक्य आजवर अशा आलेल्या अमीर गरीब दरीच्या वास्तवाचं चित्रण करणाऱ्या सर्वच चित्रपटांचं सार सांगतो. नुकताच आलेला नागराज मंजुळे यांचाझुंडहा चित्रपट सुद्धा याच ओळींवर आधारलेला आहे. फरक आहे तो यातल्या संघर्षात. हा संघर्ष आजवर आपण बातम्यांमध्ये पहिला आहे. ती केवळ एक बातमी म्हणून नागर समाजाकडून त्याच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्षही झालेलं आहे. इन्क्रेडिबल इंडिया, इडिया शायनिंग, डिजिटल इंडिया या कोणत्याच पठडीत सामावून घेतलेला एक वर्ग यातदिसतो’. हा वर्ग मुंबई सारख्या शहरात रोज दिसतो. काही तरी विकताना, काहीतरी मागताना, शिव्या घालताना, चरस गांजा ओढत गल्लीच्या तोंडावर बसलेला, पोलिसांच्या बेड्यांमध्ये अडकलेला आणिभारत का मतलब क्या?” असं विचारणाऱ्या पण स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनी रस्त्यावर झेंडे विकणाऱ्या पिंजारलेल्या केसांच्या मागे हा वर्ग दिसतो’. हा समाज आपलाच कचरा साफ करत असतो, आपणच घाण केलेल्या शहराला स्वच्छ ठेवत असतो. फक्त त्यात आणि आपल्यात बडेजावाची एक भिंत असते. नागराज त्या भिंती पलीकडचं ते जग दाखवतो आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात तावातावाने बोलणाऱ्या आपल्या सारख्यांना आपण कळत नकळत ज्याच्यावर अन्याय करतो आहोत तो वर्गदिसतो.’




असा वर्ग दाखवणारा हा चित्रपट पहिला नाही. आज युट्युब वर झोपडपट्टीत  राहणाऱ्या लोकांचं जिणं दाखवणाऱ्या डॉक्युमेंटरिज खूप आहेत. शिवाय स्वित्झर्लंड दाखवणाऱ्या फिल्मी दुनियेने झोपडपट्टी केवळ लोणच्यासारखी दाखवली असली तरी वेब सिरीजच्या माध्यमातून अनेकांनी हे विश्व पाहिलं आहे. सुपर थर्टीमध्ये सुद्धा हे आलंच आहे. पण यातइंडिया आणि भारतमधला फरक काय असं आपण जे व्यवस्थेला नाव ठेवण्यासाठी गुळगुळीत वाक्य वापरतो, नागराज त्यावर प्रखर भाष्य करतो. तो दाखवून देतो कीहा आहे तो फरक.’ भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे असं आवई उठवून बोललं जातं पण इथला प्रत्येक माणूस त्या महासत्तेत जाण्यासाठी सक्षम आहे का? तिथे बरोबरीने नांदू शकेल? त्याचं उत्तर अर्थात सध्या तरीनाही असंच आहे. कारण हा वर्गचनाही रेंचा आहे. स्लम सॉकर ही संकल्पना राबवणाऱ्या आणि झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलच्या सामन्यांसाठी जागतिक स्तरावर घेऊन जाणाऱ्या विजय बारसे या एका अवलियाची कथा सांगण्यासाठी नागराजने हा चित्रपट केला खरा. पण त्याने त्या माध्यमातून ते भिंतीपलिकडचं जग दाखवलं, याचं विशेष कौतुक.        

चक दे, जो जिता वही सिकंदर, लगान असे खेळांवर आधारलेले चित्रपट असू दे की सुपर थर्टी सारखा यूपीएससी परीक्षेवर आधारलेला चित्रपट असू दे यात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा प्रचंड संघर्ष दिसतो. एक अटीतटीचा सामना जिंकणं, एक अत्यंत अवघड समजली जाणारी परीक्षा पास करणं एवढं एकच ध्येय या सर्व चित्रपटात दिसतं. याच बाबतीत झुंड वेगळा ठरतो. झुंडचा अटीतटीचा सामना झोपडपट्टीतील मुलं जिंकून मध्यंतराच्या आधीच आटपतो तेव्हा आता काय बाकी राहिलं दाखवायचं, असा प्रश्न पडतो. अर्थात पुढे मोठा सामना असतो व्यवस्थेशी. आपला जन्म झाला आहे आणि आपण जिवंत आहोत इथ पासून ते, आपण ह्या गावाचे रहिवाशी आहोत, आपण अमुक शाळेत शिक्षण घेतलं आहे, आपलं लग्न झालं आहे, आपण मृत नाही इथपर्यंत सर्व दाखल्यांची फाईल आपल्याकडे तयार असेल तरच आपली दखल घेतली जाते, अन्यथा नाही हे जेव्हा डिजिटल इंडियातील भिंतीच्या पलीकडच्या वर्गाला समजतं तेव्हाच ही भिंत पडायला सुरुवात होते. हे कोणते दाखले असतात, ते कुठे मिळतात, कसे काढले जातात ह्याची उत्तरं सुद्धा त्यांना नीट दिली जात नाहीत. आपण सुद्धा ह्या भारत नामक देशाचे नागरिक आहोत हे फक्त माहित असून चालत नाही तर ते कागदोपत्री सिद्ध सुद्धा करावं लागतं, हे कळतं तेव्हा जंग जंग पछाडून यातला एक एक खेळाडू आपले सर्व दाखले तयार करतो आणि आपण एक उत्तम नागरिक असल्याचा शिक्का त्याच्या पासपोर्ट बसतो तेव्हाच तो केवळ भिंतीच्या अलीकडेच येत नाही तर आपल्या झोपडपट्टी वरून उड्डाण करून सभ्य लोकांच्या विश्वात येतो.

झुंड मध्ये त्रुटी अनेक आहेत. पण त्या सर्व तार्किक आहेत. उदा. फुटबॉलच्या सामन्यात विरोधी संघ नंतर खेळतानाही दिसत नाही. फक्त गड्डी गोदाम संघ म्हणजे आपले हिरोच दिसतात. त्यांच्यात कुठेच सामना जिंकण्याची उर्मी दिसत नाही. असं वाटतं हा सामना त्यांनी गड्डी गोदाम संघाला जिंकू दिला. नागराजच्या चित्रपटात दिसणाराशेवट यात अनेक प्रसंगात प्रत्येकाला वेगवेगळा दिसू शकतो. म्हणजे मोनिकासह (रिंकू राजगुरू) प्रत्येक खेळाडूची परदेशात जाण्यासाठी पूर्ण झालेली तयारी, अंकुशचं कचऱ्याच्या डब्ब्यात चाकू फेकून देणं, बाबूने मारलेला गोल या सगळ्यात तोशेवट दिसेल. पण नागराज टाईप शेवट म्हटला तर विमान झोपडपट्टी वरून उडणं हाच धरावा लागेल.

चित्रपटातले काही सिन्स हे फारच उत्तम झाले आहेत. यात बेंजो वाजवणाऱ्या मुलाचा सीन खूप छान आहे. याच प्रसंगात सर्व मुलं आपापल्या आयुष्याविषयी सांगतात. हा संपूर्ण सीन लिहिलेला नाही, त्या त्या मुलाने स्वत:ची कथा स्वत:च्या पद्धतीने सांगितली आहे, हेच नागराजच वेगळेपण.

सर्व कलाकारांची अदाकारी उत्तम आणि नेहमी प्रमाणे नैसर्गिक. आकाश ठोसरने सैराटच्या यशानंतर विलनची भूमिका स्वीकारणं यावरूनच त्याची आणि नागराजची जाण दिसून येते. आकाशने ते इतकं सुंदर केलंय की सैराटमध्ये त्याला पाहण्यसाठी आसुसलेले प्रेक्षक या चित्रपटातील शेवटच्या सीनमध्ये तो येतो तेव्हा अरे आता हा का आला? अशी प्रतिक्रिया देतात. संभ्याविषयी तिटकारा निर्माण करण्यात आकाश यशस्वी ठरलाय. बाकी अंकुश, बाबू, इम्रान (सोमनाथ - फँड्रीतला जब्या) असे सर्व खेळाडू कलाकार उत्तम. अमिताभ बच्चन यांच्या विषयी मी काय बोलणार? छाया कदम नीट एस्टाब्लीश होत नाहीत. काही तार्किक गोष्टी सोडल्या तर एक वेगळं विश्व पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पहावा.