विरोधात प्रहार संघटनेचा उप प्रादेशिक व्यवस्थापकांना सवाल



शहापूर आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत केद्रांवरील फसवणूक आणि गैरकारभाराबाबत नुकतेच  उप प्रादेशिक व्यवस्थापकाच्या दालनात प्रहार जिल्हा अध्यक्ष स्वप्निल पाटील व तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक व्यवस्थापक व शेतकरी यांच्यामध्ये विविध विषयावर झालेल्या चर्चेत शैलेश तिवारी व शेतकरी यांनी महामंडळाच्या उप प्रादेशिक व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरले.

प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी प्रहारतर्फे  कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलन न करता पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करुन चर्चेतून मार्ग काढण्याचे आव्हान करण्यात आले होते.

 शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर दोन महिन्यापूर्वी दिलेल्या धानाचा मोबदला बँक खात्यात जमा न करता शहापूर उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना रक्कम अदा केली असल्याची खोटी यादी प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला .शासन नियमानुसार शेतकऱ्यांना बारदान देण्यात आले नाही, तसेच प्रति क्विंटल मागे ११ रुपये दराने हमाली घेत आर्थिक पिळवणूक केली. अश्या नाना त-हेच्या अनेक तक्रारी संदर्भात यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली  यावेळी सर्व  तक्रार ऐकूण धानाची रक्कम दोन दिवसांनी अदा करण्यात येणार असुन दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले

 

यावेळी महामंडळाचे  प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील, उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे, प्रहार पदाधिकारी दिपक लढे, सल्लागार वामन केदार, संतोष धानके, सचिन राउत, सचिन कुंभार, जयवंत विशे, विजय हरणे, विनायक बोंद्रे, धनाजी वरकुटे, प्रवीण अंदाडे, सुनील गगे, चंद्रकात देसले, मयूर किरपण, तुषार पानसरे, नितीन कुडव, अकील शेख, राहुल दिनकर, धनंजय मिश्रा महिला कार्यकर्त्या प्रमिला गगे, साक्षी जाधव, प्रभावती हरणे आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.