बहुगुणी शेवगा
लेखक – सुनील बनसोड
आपला देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे.
मांसाहाराच्या तुलनेत इथं शाकाहाराला (Vegetarian Food) अधिक
प्राधान्य दिलं जातं. आयुर्वेदासारखी (Ayurveda) अनमोल
देणगीही आपल्याला लाभली आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी
गुणधर्म आता जगालाही पटले असून, जगभर त्याचा प्रसार होत आहे.
अशीच एक भाजी आहे शेवग्याची शेंग. इंग्रजीमध्ये याला ड्रमस्टिक (Drumstick)
किंवा मोरिंगा (Moringa) म्हणतात. विशेष
म्हणजे आपला देश शेवग्याचा अर्थात मोरिंगाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. शेवग्याचं
झाड अतिशय वेगानं वाढतं. त्याच्या शेंगांबरोबरच पानं, फुलंदेखील
खाण्यासाठी वापरली जातात. या झाडाचे हे तीनही भाग खूप फायदेशीर आहेत. शेवग्यामध्ये
प्रथिनं, अमीनो ॲसिडस्, बीटा-कॅरोटीन
आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉलिक असतात जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
ठरतात.
शेवग्याच्या शेंगेचे
फायदे :
§ शेवग्याच्या शेंगेमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम (Calcium) असते.
§ मुलांसाठी याचा खूपच फायदा होतो. यामुळं हाडं आणि दात मजबूत
होतात.
§ शेंगा खाल्ल्यानं गर्भवती महिलांना भरपूर कॅल्शियम मिळतं.
§ लठ्ठपणा आणि अतिरिक्त साठलेली चरबी कमी करण्यास याची मदत
होते.
§ यात फॉस्फरसचे (Phosphorus)
प्रमाण जास्त असल्यानं जास्तीच्या कॅलरी (Calories) कमी होतात.
§ याच्या सेवनानं रक्त शुद्ध (Blood Purification) होते.
§ या शेंगा खाल्ल्यानं गर्भवती महिलांना प्रसूतीच्या वेळी
जास्त वेदना होत नाहीत.
§ कर्करोगावरही (Cancer)
शेवग्याच्या शेंगा खूप फायदेशीर ठरतात.
§ मधुमेह (Diabetes), ह्रदयविकार (Heart Problem) यावरही शेवगा गुणकारी
ठरतो.
§ यकृतच्या आरोग्यासाठीही शेवगा लाभदायी आहे.
§ रोगप्रतिकार शक्ती (Immunity)
वाढविण्यासाठीदेखील शेवगा उपयुक्त ठरतो.
§ त्वचेसाठीही (Skin)
शेवगा खूप फायदेशीर आहे.
शेवग्याची पाने कशी
वापरावीत:
शेवग्याच्या
पानांमध्ये उच्च रक्तदाब (High Blood
Pressure) नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात. उच्च रक्तदाब असणाऱ्या
रुग्णांनी शेवग्याच्या पानांचे पाणी आवर्जून प्यावे. यासाठी एक ग्लास पाण्यात
शेवग्याची थोडी पाने टाकून ते पाणी उकळा. पाणी उकळून अर्धे झाल्यावर ते थंड करून
घ्या. नंतर ते पाणी गाळून घ्यावं आणि प्यावं. रक्तदाब वाढलेला असेल तेव्हा सलग दोन
दिवस हे पाणी प्या. त्यानंतर रक्तदाब कमी झाल्यानंतर हे पाणी दोन दिवसांच्या
अंतरानं घ्या. या काळात दररोज आपला रक्तदाब तपासा ज्यामुळं रक्तदाब किती कमी झाला
आहे, हे समजेल. त्यानंतर आठवड्यातून एकदा हे पाणी पिणं योग्य
ठरेल.
आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व
व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा 🙂
https://chat.whatsapp.com/BuqyaWDUYdJAQ9ZCUu50rQ
-
सुनील
बनसोड
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.