राहुल गांधींसोबत मोहम्मद हजिदा 


आता पदयात्रा थडकणार महाराष्ट्रात....  

भारत जोडो ... राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भय, कट्टरता आणि द्वेषाचे राजकारण याच्या विरोधात सुरु झालेली पदयात्रा आता सर्वतोमुखी झाली आहे.

कन्याकुमारीपासून सप्टेंबर २०२२ रोजी सुरु झालेली ही पदयात्रा ३५७० किलोमीटरचं अंतर १५० दिवसात पार करून जम्मू काश्मीरमध्ये जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. आज नोव्हेंबर रोजी ह्या यात्रेने ६१ दिवस पूर्ण केले आहेत आणि यासाठी आश्चर्य, कौतुक, विश्वास या सोबत विरोधकांची टीका अशा संमिश्र भावना व्यक्त होत आहेत. मात्र या यात्रेत राहुल गांधी एखाद्या पैलू पडलेल्या हिऱ्याप्रमाणे झळाळून उठले आहेत एवढं नक्की. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर कॉंग्रेसला अशा प्रकारच्या उपक्रमाची गरज होतीच, त्याच धर्तीवर म्हणूया, राहुल गांधीचं व्यक्तित्व निखरण्यासाठी सुद्धा याची गरज होती, आणि ते त्यांनी साध्य केलंच.

दांडगा उत्साह तितकाच फिटनेस...


या पदयात्रेत राहुल गांधी अनेक लोकांना भेटत आहेत, मुलांना भेटत आहेत, त्यांच्याशी गप्पा मारत आहेत, खेळत आहेत, धावण्याची स्पर्धा लावत आहेत. हे सर्व काही चालतच सुरु आहे. ते थांबतात ते जागतिक दर्जाची जीन्स बनवणाऱ्या एखाद्या कारखान्यात किंवा एखाद्या अपंग व्यक्तीच्या कामाचं कौशल्य पाहण्यासाठी. यातच त्यांच्या थांब्याच्या ठिकाणी त्यांना अनेक लोक भेटायला येत आहेत.

तेलंगणाच्या शमशाबाद मध्ये राहुल गांधी नोव्हेंबर २०२२ रोजी पोहोचले तिथे महिलांची आणि तृतीय पंथियांसाठी काम करणाऱ्या संघटनेतील कार्यकर्ते आणि महिला त्यांची वाटच पहात होत्या. राहुल गांधी त्यांना भेटले आणि त्यांच्या सर्व समस्या समजून घेतल्या. यात तृतीय पंथीय, घरकामगार महिला आणि अॅसिड अटॅक झालेली मोहम्मद हजिदा ही मुलगी सुद्धा त्यांना भेटली. हजिदा वर २०१४ साली एका मुलाने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे दोन गॅलन भरून अॅसिड फेकलं होतं. हे अॅसिड हजिदा सोबत असलेल्च्याया तिच्या आईवरही पडलं. त्याला अटक झाली मात्र हजिदा आपलं सर्वस्व हरवून बसली. तिचा आणि तिच्या आईचा जगण्यासाठी संघर्ष सुरु होता पण तिच्या आईने पंधरा दिवसांनी मृत्यूसमोर शरणागती पत्करली. हजिदा मात्र नाकाने नीट श्वास घेता येत नाही, डोळ्याने नीट दिसत नाही,  घास गिळताना त्रास होतो अशा अवस्थेत चार सर्जरी झाल्या नंतरही जगते आहे. तिच्यावर आणखी काही सर्जरी होण्याची आवश्यकता आहे असं सांगितल्यावर राहुल गांधींनी त्याची शाश्वती दिली.   

शमशाबादमधील महिला प्रतिनिधीसोबत...

 
       

राहुल गांधी यांची पदयात्रा आता महाराष्ट्रात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांची जोमाने तयारी सुरु आहे. कित्येक लोक मोठ्या उत्साहाने नांदेडकडे रवानाही झाले आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्रातील ही भारत जोडो यात्रा फार महत्त्वाची ठरणार आहे असं म्हटलं जात आहे. असं असलं तरी राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने पूर्ण आराखडा अगदी व्यवस्थित आखला आहे असं त्यांच्या एकूण कार्यक्रमाकडे पाहताना दिसत आहे. महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांतून ही पदयात्रा जाणार आहे. मात्र ह्या मार्गात येणाऱ्या वन विभागाच्या रस्त्यावरून ही पदयात्रा गाडीने जाणार असल्याचं वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्या सोबत फार मोठा जनसमुदाय आणि त्यांना असलेली झेड प्लस सुरक्षेचे कर्मचारी चालत असतात. त्यामुळे या सगळ्या गोतावळ्याचा त्रास वन्य प्राण्यांना होऊ नये, पर्यावरणाला हानी पोहोचू नये यासाठी कन्याकुमारीपासून ही पदयात्रा सुरु झाल्यापासून तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील वन विभागातून जाताना राहुल गांधी यांनी गाडीनेच प्रवास केला आहे. तोच शिरस्ता ते महाराष्ट्रातही पळणार आहेत.

आता महाराष्ट्रात...


वाशीम जिल्ह्यातील मेडशी ते पातुर आणि बुलढाणामध्ये जामोद ह्या भागात जंगल आहे. त्यामुळे हा भाग ते गाडीने पार करणार आहेत. १६ नोव्हेंबरला राहुल गांधींची पदयात्रा अकोल्यात येणार आहे तर १८ नोव्हेंबरला शेगावला पोहोचल्यावर संध्याकाळी वाजता ते लोकांना संबोधित करणार आहेत. शेगावच्या तीर्थक्षेत्राचेही दर्शन ते घेणार आहेत. मात्र या यात्रेत ते सुरक्षा यंत्रणेने सुचवल्या प्रमाणे गाडीने यात्रा करणार आहेत. “त्यामुळे यात्रेच्या पदया मूळ उद्देशालाच छेद जात आहे,” असं काही विघ्नसंतोषी लोक आणि प्रसार माध्यमं म्हणत असली तरी सर्वांच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे हे जाणूनच राहुल  गांधी असल्या टीका मनावरन घेता मार्गक्रमणा करत राहतील. मिले कदम, जुडे वतनहे पद या पदयात्रेत सार्थ ठरत आहे हे नक्की.


Route Map of Bharat Jodo Yatra