माझ्या विषण्ण मनाला चिंबवू न शकलेल्या निस्तेज धारा नकोयत मला

मी स्वत:च्या प्रवाहात खुश आहे, मुजोरीचे बंधारे नकोयत मला....

तुमच्या विश्वात माझी नगण्यता मी पहिली,

तुमचे इंचाइंचा वर वसलेले टकमक बुरुज नकोयत मला....

सर्व जग खूप प्रगल्भ आहे, पुरातन आहे, शहाणं आहे

मीच आहे बाळबोध, त्यात विद्वत्तेचे धुमारे नकोयत मला....

खूप खेळून पहिली मी हि खेळी सुद्धा

आंधळ्या कोशिम्बिरीचे हे डाव नकोयत मला....

मी नदी आहे, वाहत राहीन कड्यांवरून तुषार पेरत

माझे तुषार झेलू न शकणारे नकोयत मला....

मी स्वत:च्या प्रवाहात खुश आहे, मुजोरीचे बंधारे नकोयत मला....

मुजोरीचे बंधारे नकोयत मला....

----- विनिशा