सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या ‘साहित्य अकादमी’ या स्वायत्त संस्थेतर्फे २४ भारतीय भाषांसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात खोपोलीतील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सादिका नवाब (सहर) यांच्या ‘राजदेव की अमराई’ या उर्दू भाषेतील कादंबरीला प्रतिष्ठित ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
कुरतुल
ऐन हैदर यांच्यानंतर ५६ वर्षांनी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. सादिका नवाब या दुसऱ्या महिला लेखिका आहेत. साहित्य आणि भाषा क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला जातो. रोख १ लाख रुपये, ताम्रपट, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या १२ मार्च २०२४ रोजी हा पुरस्कार त्यांना सन्मानाने दिल्ली येथे प्रदान करण्यात येईल.
आंध्रप्रदेशमधील गुंटूर येथे जन्मलेल्या डॉ. सादिका नवाब मुंबईत वाढल्या. त्यांनी एम.ए. (उर्दू), एम.ए. (इंग्रजी), एम.ए. (हिंदी) या विषयांत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतल्यानंतर ‘गझल शिल्प और संवेदना विशेष संदर्भ- दुष्यंत कुमार’ या विषयावर मुंबई विद्यापीठातून पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.एम.सी. महाविद्यालयातून हिंदी विभाग प्रमुख म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. हिंदी विषयात त्यांनी पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.