गुरुकुल प्रतिष्ठान’तर्फे २० आणि २१ जानेवारी रोजी आयोजित दोन दिवसीय ‘बासरी उत्सव’मध्ये रविवारी विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली ‘फ्लूट सिम्फनी’मध्ये तब्बल ९० बासरीवादक सहभागी झाले होते. त्यानंतर या महोत्सवात पंडित हरीप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार पंडित स्वपन चौधरी यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर स्वपन चौधारी यांचे एकल तबलावादन सादर झाले. त्याशिवाय ‘बासरी उत्सव’मध्ये शशांक सुब्रमण्यम यांनी कर्नाटकी बासरीवादन सादर केले. ठाणे येथील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.