मुंबई : युआरएल फाउंडेशनच्यावतीने गुरुवार, दि. २९ मे रोजी उद्योजक उदय लाड यांच्याकडू्न त्यांच्या ८३ व्या जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. यंदा सुप्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक, कलाकार, निर्माता सचिन गोस्वामी, पद्मभूषण सुप्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक राजदत्त, समाजसेविका सुजाता रायकर, समाजसेवक प्रसाद गावडे यांना एक लाख व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तर वैज्ञानिक, लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, अं.नि.सच्या वंदनाताई शिंदे यांना रुपये पन्नास हजार व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. 

युआरएल फाउंडेशनचे संस्थापक दरवर्षी उदय लाड यांचा २९ मे हा जन्मदिन 'कृतज्ञता दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा 'सामाजिक गौरव पुरस्कार' प्रदान करू सत्कार करण्यात येतो . गेली २३ वर्षे उद्योजक उदय लाड हे सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत. यंदा ते ८३ व्या  वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने हा २४ वा 'कृतज्ञता दिवस'  सोहळा गुरुवार, दि. २९ मे रोजी सायं. ६ वा. यशवंत नाट्य मंदिर जे.के. सावंत मार्ग, जोशी वाडी माटुंगा (पश्चिम) येथे  होणार आहे. तरी या कौतुक सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.