पारंपरिक औषध उपचार पद्धतीवरील एका ऐतिहासिक कराराद्वारे
आयुषला जागतिक स्तरावर मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताची जागतिक आरोग्य
संघटनेसोबत भागीदारी
जागतिक आरोग्य संघटनेच्या रोगांच्या आंतरराष्ट्रीय
वर्गीकरणाला (ICD-11) पूरक असलेले
आंतरराष्ट्रीय आरोग्य उपाय वर्गीकरण (ICHI), कोणते उपचार आणि आरोग्य उपाय केले जातात याचे
दस्तऐवजीकरण करते. पारंपरिक औषध प्रारुपाच्या समावेशासह, आयुर्वेद, योग, सिद्ध आणि युनानी
प्रणालींमधील उपचारपद्धती - जसे की पंचकर्म, योग चिकित्सा, युनानी चिकित्सा आणि सिद्ध प्रक्रिया - आता जागतिक स्तरावर
प्रमाणित पद्धतींच्या रुपात ओळखल्या जातील.
यामुळे अनेक फायदे होतील:
● आयुष सेवांसाठी
पारदर्शक बिलिंग आणि वाजवी किंमत.
● आरोग्य विमा
संरक्षणात आयुष उपचारांचे सुलभ एकत्रीकरण.
● रुग्णालय
व्यवस्थापन, क्लिनिकल
दस्तऐवजीकरण आणि आरोग्य संशोधन वाढवणे.
● सर्वात
महत्त्वाचे म्हणजे, आयुष
उपचारांसंदर्भात अधिक जागतिक सुलभता.
या कराराचे स्वागत करताना, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस
अधानोम घेब्रेयेसुस यांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"पारंपरिक औषध आणि
आरोग्य उपायांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणासाठी @WHO च्या कामासाठी #India कडून ३० लाख डॉलर्स योगदानासाठी @moAyush सचिव वैद्य राजेश कोटेचा
यांच्याशी करार करताना आनंद होत आहे. #HealthForAll साठी 🇮🇳 च्या निरंतर वचनबद्धतेचे आम्ही स्वागत करतो."
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.