ही एक नवीन जाळी आहे जी तुमच्या गॅसची बचत करते आणि तुमच्या तब्बेतीचीही काळजी घेते.  

तुम्ही तुमच्या गॅस काहीतरी पदार्थ बनवत आहात आणि तो १० मिनिटं झाकण लावून ठेवायचं म्हणून तुम्ही तो तसाच गॅसवर ठेवला आहे. १० मिनिटांनी तुम्ही तो पदार्थ पाहायला किचन मध्ये आल्यावर तुमच्या लक्षात आलं की गॅस तर बंद झाला आहे आणि त्यातून शिटी सारखा आवाज येतो आहे. तुम्ही घाबरता आणि आणि आधी सर्व खिडक्या उघडता. कोणत्याही स्वीचचे बटन चालू किंवा बंद करत नाही कारण तुम्हाला माहित असतं की तेवढ्या वेळात तुमच्या गॅसच्या शेगडीतून बराच गॅस लिक झाला आहे आणि आता बटन नुसतं चालू बंद करताना निघणारी एखादी ठिणगी सुद्धा तुमच्या घराला आणि संपूर्ण सोसायटीला आग लावायला पुरेशी ठरेल. तुम्ही १०-१५ मिनिटं तो घरात भरलेला गॅस पूर्णपणे खिडकी वाटे निघून जाण्याची वाट पाहता आणि मग सर्वात आधी मोठा धीर करून एक बटन सुरु करून पाहता. आग लागत नाही, मग दुसरं एखादं बटन सुरु करता, तेव्हाही आग लागत नाही आणि तुम्ही निर्धास्त होता.

असा प्रसंग तुमच्यावर कधी आला आहे का? माझ्या बाबतीत काही दिवसांपूर्वीच असं घडलं होतं. मी गॅस वर दुधाचा कुकर ठेवला होता आणि त्या कुकरच्या शिटीतून निघणाऱ्या पाण्याने गॅस बंद झाला होता. वर उल्लेखिलेल्या प्रमाणेच माझी अवस्था झाली होती. या सगळ्यात आपण एका मोठ्या संकटातून वाचलो याचं मोठं समाधान होतंच पण एवढा गॅस वाया गेला याचं दु:खही होतं.

गॅसवर डाळ दुधासारखे पदार्थ ठेवले तर ते उतून जाऊन गॅस विझतो तसाच तो खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे सुद्धा विझतो. एवढंच नाही तर गॅस शेगडीच्या बर्नार मधून निघताना इकडे तिकडे जात असतो. गॅस लिक झाल्यामुळे बाहेर येणाऱ्या वायुपेक्षा हा असा इकडे तिकडे जाणारा वायू कमी असला तरी तो तेवढाच घातक असतो.

गॅसमध्ये मुळात हायड्रोजन हा वायू भरला जातो. याला वास नसतो आणि आवाजही नसतो. पण असा वाऱ्याने गॅस विझला तर घरातील लोकांच्या लक्षात यावं म्हणून गॅस बनवणाऱ्या कंपन्या त्यात हायड्रोजन आणि सल्फर यांचं मिश्रण असलेला मेरकॅप्टान (Mercaptan) हे संयुग सुद्धा भरतं. यामुळे गॅस लिक झाला तर त्याला कुजलेल्या अंड्यासारखा वास येतो आणि शिटी सारखा आवाज येतो.

लिक होणाऱ्या गॅसची घातकता या मेरकॅप्टानमुळे वाढते. कारण हा गॅसमधून सतत पाझरत राहिला तर त्याने घरातील लोकांना चक्कर येऊ शकते, डोकेदुखी होऊ शकते, डोळ्यांना आणि घशाला त्रास होऊ शकतो. गॅसजवळ सतत राबणायांना यामुळे त्रास होतो. स्त्रियांना विशेष करून. ते त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ते इतर कोणाच्याही लक्षात येत नाही.    

डाळ दुधासारखे पदार्थ ठेवले तर ते उतून जाऊन गॅस विझतो यावर गॅस मोठा असताना तिकडे नीट लक्ष ठेवणं हा एकच उपाय असतो. मात्र गॅस खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे विझत असेल आणि गॅस सुरु असताना त्यातून थोडा थोडा गॅस पाझरत असेल तर यावर उपाय केलाच पाहिजे. आणि त्यासाठी एरीज या कंपनीने एक गॅस कवच आणलं आहे.

https://amzn.to/3RCv72K या  लिंक वर क्लिक करून तुम्ही तिची संपूर्ण माहिती वाचू शकता आणि विकतही घेऊ शकता. 

ही एक जाळी आहे आणि ती तुम्ही गॅसच्या कड्यांच्याभोवती एखाद्या प्लेट प्रमाणे ठेवू शकता. यामुळे विस्तवाला वारा लागत नाही आणि गॅस लिक होत नाही. त्या गॅसच्या विस्तवाची संपूर्ण धग त्यावर ठेवलेल्या पातेल्यालाच लागते. त्यामुळे गॅस वाया जात नाही. याशिवाय कधी कधी डाळ, किंवा दुधा सारखे द्रव पदार्थ उतून गेल्याने गॅस खराब होतो हे सुद्धा या जाळीमुळे टाळता येतं. आपल्या खिशाला परवडणारी अशी ही जाळी नक्की वापरून पहा. कदाचित तुमच्या बचतीत आणखी बचत होईल आणि तुमची किचन मध्ये गॅस जवळ काम करताना होणारे त्रास तुम्हाला होणार नाहीत!

गॅस वाचवा! बचत करा! मित्र आणि मैत्रिणींनो तब्बेत सांभाळा!