कमाल खान गेले. आज दोन दिवसांनी समजलं. ते ही सवयीप्रमाणे द वायर मराठी उघडलं आणि समोर कोमल कुंभार यांनी रविश कुमार यांचा भाषांतरित लेख पहिला तेव्हा. हे असं का लिहिलंय तेव्हा जरा बातम्या पहिल्या तेव्हा कळलं. कमाल खान गेले. आपलं आयुष्य इतकं व्यस्त झालं आहे याचा क्षोभ होतो कधी कधी. त्यांच्या निधनावर मी काही त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला जाणार नव्हते. पण काही लोक आपल्या आयुष्यात असे असतात जे फक्त आपल्या मेंदूला माहित असतं. हा माणूस काहीतरी वेगळा आहे आणि आपल्या व्यवसायातील एक असा माणूस आहे ज्याच्याबरोबर काम करायला आपला मेंदू आसुसलेला असतो. पण त्या मेंदूलाच माहित असतं आपली पोच तिथपर्यंत नाही. मग जेव्हा त्यांच्या मृत्यूची खबर मिळते तेव्हा एखादा चमत्कार होण्याची अपेक्षा सुद्धा विरून जाते. कमाल खान एक असे रिपोर्टर होते ज्यांच्या बातम्या पाहताना आपल्याला काही तरी नवीन गवसत असायचं. त्यांच्या नावावरून लोकांनी त्यांना उकसावण्याचा प्रयत्न केला असेल पण शांत, संयमी असलेल्या कमाल खान यांनी नेहमी आपल्या कामाला महत्त्व दिलं. वाराणसी अयोध्यात रिपोर्टिंग करताना सुद्धा त्यांच्या बातमीत कधी हिंदुसाठी धर्मद्वेष आणि मुसलमानांसाठी झुकतं माप दिसलं नाही. त्यांचे रिपोर्ट्स हे लोकांच्या मनात घालमेल निर्माण करून जायचे. म्हणूनच रविश कुमार यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे,
“उस काम को करते हुए हमने एक कमाल ख़ान को देखा और सुना है. जिसे जानना इसलिए भी ज़रूरी है ताकि पता चले कि कमाल ख़ान अहमद फराज़ और हबीब जालिब के शेर सुन कर नहीं बन जाता है. दो मिनट की रिपोर्ट लिखने के लिए भी वो दिन भर सोचा करते थे. दिनभर पढ़ा करते थे और लिखा करते थे. उनके साथ काम करने वाले जानते थे कि कमाल भाई ऐसे ही काम करते हैं. यह कितनी अच्छी बात है कि कोई अपने काम को इस आदर और लगन के साथ निभाता है. अयोध्या पर उनकी कई सैकड़ों रिपोर्ट को अगर एक साथ एक जगह पर रखकर देखेंगे तो पता चलेगा कि पूरे उत्तर प्रदेश में कमाल ख़ान के पास एक अलग अयोध्या था. वो उस अयोध्या को लेकर गर्व के नाम पर नफरत की आग में बदहवास देश से कितनी सरलता से बात कर सकते थे. उसके भीतर उबल रही नफ़रत की आग ठंडी कर देते थे. वे तुलसी के रामायण को भी डूबकर पढ़ते थे और गीता को भी. कहीं से एक-दो लाइनें चुराकर अपनी रिपोर्ट में जान डाल देने वाले पत्रकार नहीं थे. उन्हें पता था कि यूपी का समाज धर्म में डूबा हुआ है. उसके इस भोलेपन को सियासत गरम आंधी में बदल देती है. उस समाज से बात करने के लिए कमाल ने न जाने कितनी धार्मिक किताबों का गहन अध्ययन किया होगा. इसलिए जब कमाल ख़ान बोलते थे तो सुनने वाला भी ठहर जाता था. सुनता था.”
आज त्यांच्या विषयीच्या अनेकांच्या प्रतिक्रिया वाचताना वाटतंय की माझ्या सारखे अनेक पत्रकार आहेत ज्यांना त्यांच्या सोबत काम करायचं होतं पण ते शक्य झालं नाही आणि यापुढे तर ते शक्यच नाही. आपल्या सखोल अभ्यासातून तयार झालेला रिपोर्ट आपल्या गंगा जमनी तहजीबमध्ये मांडून लोकांना खिळवून ठेवणारे कमाल खान यांचं स्थान पत्रकारितेतील काही मोजक्या लोकांप्रमाणे कायम अबाधित राहील. त्यांना भावपूर्ण आदरांजली!!!
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.