राष्ट्रवादी कॉंग्रेस मधल्या महिला मोर्चाच्या आक्रमक स्त्री नेत्या चित्रा वाघ या एके दिवशी भाजपवासी झाल्या आणि लगेचच तलवार उपसून कामाला लागल्या. २०२१ साली हे पक्षांतर झालं

मुळात चित्रा वाघ राजकारणात आल्या २०१४ साली, राष्ट्रवादीच्या माध्यमातून. सुरूवातीपासूनच त्यांची कामगिरी दमदार. पण झालं असं की २०१६ साली त्यांचे पती किशोर वाघ हे एका लाच प्रकरणात अडकले. तेव्हा राज्यात भाजप सेना सरकार होतं. २०१९ ला भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही तो सत्ताधारी बनू शकला नाही. दरम्यान पतीचे लाच प्रकरण राष्ट्रवादी पक्षांतर्गत शह काटशह यातून राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या प्रसाद लाडांनी चित्रा वाघ यांच्यासाठी भाजपत जागा केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपवासी झाल्यावरही चित्रा वाघांचा फोकस हा महिला हाच राहिला त्या पूर्वीच्याच धडाडीने कार्यरत रहात, सतत माध्यमात चर्चेतही राहिल्या. राहताहेतमविआ सरकारमधले मंत्री संजय राठोड यांच्या कथित प्रेमप्रकरणात आत्महत्त्या केलेल्या मुलीच्या बाजूने चित्रा वाघ यांनी असा काही जोर लावला की मुलीचे पालक गप्प बसले असतानाही चित्रा वाघांनी उध्दव ठाकरेंना राठोडांचा राजीनामा घ्यायलाच लावला. राठोडांनी शेवटी आपल्या भटक्या जातीचे अस्त्रही उपसून पाहिले पण त्यांना मंत्रीपद गमवावे लागलेच. कोर्ट केस चालू राहिल, त्यातून ते निर्दोष सुटतीलही.पण चित्रा वाघ या निमित्ताने चर्चेत राहिल्या. पुढे भाजपने चर्चेत ठेवलेली दिशा सॅलियन सारखी प्रकरणे असोत की कुठे महिला अत्त्याचाराच्या घटना असोत. चित्रा वाघ घटनास्थळी दाखल होणारच! अपवाद धनंजय मुंडे प्रकरणाचा! अर्थात यात पक्षाने प्रामुख्याने देवेन्द्रजींनीच यात आस्ते कदम करत पीछे कदम केल्याची चर्चा आहे.

हा सगळा पूर्वेतिहास सांगितला एवढ्यासाठी की मुंबईत जन्मलेल्या, पदवीधर चित्रा वाघ २०१४ सालात राजकारणात येतात पदार्पणातच पक्षांतर करूनही धडाडीने ज्या पक्षात जातील तिथली महिला आघाडी त्या जोरकसपणे सांभाळतात. पण कधी कधी काय होतं हा महिला प्रश्नाचा विरोधी पक्षीय अभिनिवेश अंगात इतका भिनतो की समोर आलेल्या प्रकरणाची प्राथमिक माहितीही घेता सरकार मंत्री यांना धारेवर धरलं जातं. बाईट भुकेली वाहिनी पत्रकारिताही अशीच शहानिशा करता ते प्रकरण दाखवत राहतात. पण काही वेळा प्रकरण अंगाशी येतं, उलटतं अथवा त्याला केलेला विरोध हा मूळातच चुकीचा ठरतो. पण आपल्याकडे चूक खुलेपणाने मान्य करण्याची राजकारण्यांना, बाईटधारी माध्यमांना सवयच नसल्याने ते नंतर अळीमिळी गूपचिळी करून बसतात. असंच एक अभिनिवेशाने बाहेर काढलेलं नंतर गपचूप म्यान केलेलं प्रकरण या संदर्भात आवर्जून नागरिकांना कळावं म्हणून इथे मांडतोय.

आपल्याकडे अंगणवाडी सेविका आशा यांना आरोग्यासंदर्भात गावोगावी काम करावे लागते. अत्यंत तुटपूंज्या वेतनात इतर गैरसोयीत या आशा सेविका काम करतात. तर मध्यंतरी त्यांना कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत संतती प्रतिबंधक उपायांचे एक कीट देण्यात आले. संतती प्रतिबंधक उपाय, औषधे, गोळ्या यासोबत गर्भनिरोधक वस्तूंचाही त्यात समावेश होता. पू्र्वी लाजेने उच्चारला वापरला जाणारा निरोध सध्या थेट टीव्ही वरून उन्मादक जाहिरातीतून सर्वामुखी झालेला वापरातही सर्व बंधने गळून पडलेला कंडोम याचाही समावेश त्या किटमध्ये जसा होता तसंच एक रबरी पुरूष लिंगही दिले होते!

झालं. सरकार आशा सेविकांहाती रबरी लिंग देते? संस्कृतीदक्ष पक्षातल्या चित्रा वाघांचा पाराच चढला! सरकारला निर्लज्ज वगैरे ठरवत त्यांनी नेहमीप्रमाणे सपासप वार केले. अधिवेशन चालू असल्याने चित्रा वाघांचा रूद्रावतार पाहता मंत्रीमहोदयही सभागृहात बॅकफूटवर गेले चौकशी करून दोषींना सजा वगैरे सांगून मोकळे झाले. बहुधा सचिव ही संस्कृतीरक्षणाच्या बाजूचे असावेत आणि त्यांनी तपशिलात जाता मंत्रीमहोदयांना बॅकफूटवर उभे केलेनंतर दोन दिवसांनी आरोग्य विभागातील वा या मोहिमेच्या संबंधित एका महिला अधिकारी वा मोहिम प्रमुखाने खुलासा केला रबरी लिंगावरून जो गहजब झाला त्याला नीट शास्त्रीय उत्तर दिले. आशा सेविका ज्या समूहात काम करतात तिथल्या स्त्री पुरूषांच्या लैंगिक जाणीवा, स्वत:च्या जननेंद्रियांविषयीचे अज्ञान, गर्भनिरोधक साधनांची माहिती त्याच्या वापराबद्दल असलेले समज, गैरसमज, हट्ट याचा विचार करून ही किट बनवलेली असतात. गर्भधारणा नको हे त्या समूहातल्या स्त्रिया आपल्या पुरूषाला सांगू शकत नाहीत वा गर्भनिरोधक वापरण्यासाठी विनवूही शकत नाहीत. पारंपरिक पुरूषी वृत्ती समाधानाचा नैसर्गिक आनंद याबाबतीत पुरूष पुरूषीवृत्ती वरचढ रहाते. त्यात अनेकदा ही साधनेच त्यांना माहित नसतात. ती पुरविली तरी त्याचा उपयोग कसा करायचा हे माहित नसते.

पंचवीस तीस वर्षांपूर्वीचा याबाबतीतला एक सरकारी अनुभव विनोद म्हणूनही प्रचलित आहे. अशाच एका शिबिरात निरोधची माहिती देऊन प्रशिक्षिकाने तो मधल्या बोटात घालून दाखविला. निरोध घेऊन लोक गेले. तरीही बायका गर्भार राहिल्या. निरोध वापरूनही गर्भार राहिल्या! चौकशीअंती कळले निरोध वापरला पण मधल्या बोटात घालून!

कधी काळी पंचवीस पैशात तीन लाल त्रिकोण यांच्या उच्चाराने कानकोंडे व्हायचे दिवस होते. आज समाज खूपच पुढे गेलाय. सॅनिटरी नॅपकिन पासून ते कंडोम पर्यंतच्या लैंगिक अवयवासंदर्भातील वस्तूंची चर्चा आता खुलेआम होते. विक्री अगदी माॅलपासून छोट्या केमिस्टपर्यंत सर्वत्र होते. तरीही एक मोठा वर्ग या सर्वापासून कोसो दूर आहे. त्यांनी मधले बोट प्रमाण मानावे यासाठी रबरी लिंगाचा वापर प्रशिक्षण साहित्यात करावा लागलाय. यात आक्षेपार्ह काही नाही संस्कृती बुडण्याचा संबंधच नाही. आश्चर्य वाटते ते चित्रा वाघांसारख्या सुशिक्षित सामाजिक राजकीय स्त्री कार्यकर्तीने या किट मागचा उद्देश, गरज याची माहिती घेता केवळ रबरी लिंगावरून थयथयाट करावा याचे!

आज केवळ ग्रामीण वा दुर्गम भागातीलच नव्हे तर अगदी मेट्रो शहरातील स्त्रीला सुध्दा आपल्या पुरूषास कंडोम वापर हे सांगण्याची मुभा नाही हे समाजवास्तव आहे. यातून लादली जाणारी गर्भधारणा नंतरचे पालनपोषण, स्त्री शरिराची झीज अशा असंख्य प्रश्नावर विविध स्त्री संघटना, एनजीओ काम करताहेतया कामात स्त्री पुरूषांच्या लैंगिक जाणीवा, जननेंद्रिये याबद्दलची माहिती त्याचबरोबरीने लाज शरम परंपरा यांच्या पगड्यातून बाहेर काढून निरामय लैंगिक जीवन संतती नियोजन शिकविले जाते. त्यासाठी शरिर विज्ञान समजविण्यासाठी प्रसंगी अशी साधने वापरावी लागतातपण राजकीय अभिनिवेशात भाजप या पक्षाच्या सांस्कृतिक सोवळेपणाच्या सात्विक संतापातून चित्रा वाघ संतापल्या. मंत्रीही नरमले. खरं तर मंत्री महोदयांनी नीट माहिती घेऊन चित्रा वाघांचे अज्ञान उघड करून त्यांनाच स्त्री आरोग्यावरून चार खडे बोल सुनवायला हवे होते.

ज्या गोष्टीसाठी साधारण पन्नास वर्षापूर्वी .धो.कर्वे नावाचा बुद्धीमान समाजसेवक आपल्या पत्नीसह जागृती करत होता, कंडोमची ओळख करून देत होता, त्यासाठी पदरमोड करून समाजस्वास्थ्यनावाचे मासिक चालवत होता, हे सर्व मुंबईस्थित पदवीधर चित्रा वाघांना माहित नसावं?

मग त्यांनी .धो. कर्वेंसह, महात्मा फुले सावित्रीबाईंनी केलेली विधवा ब्राह्मणी स्त्रियांच्या गर्भपातांची वा बाळंतपणाची कहाणी वाचावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंबनियोजनावरचे विचार वाचावेत, त्यांनी .धो.कर्वेंवरचे चालवलेले खटले त्याचे वृत्तांत वाचावेत. मनुवादी पुरोहितशाहीचे समर्थन करणाऱ्या त्यांच्या पक्षात हे वाचनहोत नसणार. त्यासाठी पक्षापलिकडे स्त्रीजाणीवेतून चित्रा वाघांना पहावे, वाचावे लागेल.

संजय

पवार