प्रत्येक वेळी आपल्या आवडीची घटना घडत नाही पण वेळ सांगणारं घड्याळ मात्र आपण आपल्या आवडीचं घेऊ शकतो. नाही का?
आता घड्याळ महाग घ्या नाही तर स्वस्त ते आपल्याला इथे भारतात Indian Standard Time च सांगणार. पण त्या सोबतच ते घड्याळ तुमची अभिरुची दाखवत असेल तर? Amazon वर अशी अनेक घड्याळं आहेत जी तुमच्या लिविंग रूम, बेडरूम किंवा ऑफिसला एक मोहक रूप देतील त्यातीलच एक मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. हे घड्याळ तुमच्या घरातील आबाल वृद्धांना येणाऱ्या पाहुण्या मंडळींना, ऑफिसमध्ये लावणार असाल तर तुमच्या सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना सुद्धा आकर्षित करेल.
फेसबुक लिंक :
या लिंक वर क्लिक केल्यावर तुम्हाला मिल्टोची डिझाईन असलेलं घड्याळ दिसेल.
मिल्टोच्या डिझाईनमध्ये वर घड्याळ आहे, या घड्याळावर एक पक्षी आहे. या घड्याळाखाली झाडाच्या दोन फांद्या आहेत आणि त्यावर पानं, फुलं आणि एक पक्षी आहे. याचं मुख्य आकर्षण आहे ते या फांदीवर लटकलेला एक झोपाळा आणि त्यावर असलेले दोन चहाचे कप. ही संपूर्ण डिझाईन थ्रीडी मध्ये आणि काळ्या रंगात आहे. याची रुंदी ६९.९ सेंटीमीटर तर उंची ४१.९ सेंटीमीटर आहे. त्यामुळे ही डिझाईन कोणत्याही पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या भिंतीवर उठून दिसेल.
जेव्हा तुम्ही हे Milto 3D Acrylic Analog Tree,
Bird, Shape Designer Large Decorative Wall Clock विकत घेण्याचा विचार कराल तेव्हा हे घड्याळ आणि त्याची डिझाईन कशी जुळवावी याचा विडीयो नक्की पहा. यामुळे तुम्ही अगदी सहज ही डिझाईन तुमच्या लिविंग रूम, बेडरूम किंवा ऑफिसमध्ये लावू शकाल.
ही डिझाईन ऑर्डर केल्यावर ती एका बॉक्समध्ये वेगवेगळ्या भागात तुम्हाला मिळेल. अनबॉक्स करताना त्याचं विडीयो रेकॉर्डिंग करा आणि थोडं सांभाळून हाताळा. कारण या सर्व वस्तू अॅक्रिलिकच्या आहेत. पण जर तुम्हाला हे घड्याळ नुकसान झालेल्या अवस्थेत मिळालं असेल तर त्या विडीयो रेकॉर्डिंगमुळे तुमच्याकडे त्याचा पुरावा राहील आणि तुम्ही हे घड्याळ परत करू शकाल. पण जर तुम्हाला ते सुस्थितीत मिळालं तर तुमच्या आनंदाला पारावर राहणार नाही.
ह्या घड्याळाप्रमाणे आणखीही डिझाईन्स तुम्ही इथे पाहू शकाल आणि तुम्हाला हवं ते निवडून त्यांच्या प्रतिक्रिया वाचून तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीसाठी एक शोभिवंत घड्याळ निवडू शकाल.
या घड्याळाच्या आगमनाने तुमच्या घराचं आणि ऑफिसचं वातावरण नक्कीच बदलून जाईल. फार विचार करू नका. लवकर हे घड्याळ घेऊन टाका. वेळ कोणत्या घड्याळासाठी सुद्धा थांबत नाही ना!
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.