शेअर मार्केटमधलं आपल्याला काही कळत नाही असं म्हणणारा मराठी माणूस सुद्धा हर्षद मेहता आणि केतन पारेख ही दोन नावं आली की थबकतो.
ह्या लोकांनी कोणते कारनामे केले होते हे लोकांना माहित आहे पण मराठी जनांना ह्या दोघांनी शेअर मार्केटमध्ये काही तरी मोठा घोटाळा, घपला केला होता या पलीकडे काही माहित नसतं. मुळात शेअर मार्केट हे प्रकरणच आपल्या गावी नसतं त्यामुळे त्यातील चढ उतार, बेचो – खरीदो ही भाषा आपल्याला परग्रहावरचीच वाटते. ही कामं फक्त गुजरात्यांनी करावी अशी आपली ठाम समजून असते. पण आज जग बदलतं आहे.
आज शेअर मार्केट आणि त्यातले व्यवहार मराठी माणसांना समजावेत म्हणून ह्या क्षेत्रातील जाणकार लोक शिबिरं घेत असतात, online सेमिनार घेत असतात, शक्य तिथे व्याख्याने देतात. एवढंच नाही तर टीवी वर दुपारच्या वेळात रोज कोणत्या ना कोणत्या दूरचित्रवाणी वाहिनीवर याचे कार्यक्रम सुरु असतात. यामुळेच मराठी माणूस आता हळू हळू,
भीत भीतच का होईना पण याची चव चाखू लागला आहे. यात आपल्या महिला आघाडीवर आहेत. म्हणूनच ह्या शेअर ट्रेडिंगची सुरुवात करताना आपण सावध राहिलं पाहिजे हा सल्लाही तो स्वत:ला देतो. पण हर्षद मेहता आणि केतन पारेखच्या कारनाम्यांची आठवण झाली की ह्या क्षेत्राविषयी शंका वाटू लागते. यासाठी या क्षेत्राची फक्त बेरजेची बाजूच नाही तर वजाबाकीची बाजूही आपल्याला समजली पाहिजे. ह्यासाठी हा घोटाळा समोर आणणाऱ्या सुचेता दलाल यांच्या सोबत देबाशिष बसू यांनी लिहिलेलं ‘The Scam’ हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि आता ते मराठीत उपलब्ध आहे. याचा अनुवाद अतुल कहाते आणि पूनम छत्रे यांनी केला आहे.
ह्या लिंकवर क्लिक करून किंवा फेसबुक वरील
ह्या लिंक वर क्लिक करून आपण पुस्तक नक्की विकत घ्या.
१९९२ साली हर्षद मेहताने तर अवघ्या नऊ वर्षांनी म्हणजेच २००१ साली केतन पारेखने अगदी एकसारखे घोटाळे केले. यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं याकडे फार लक्ष नसल्यामुळे अनेक बँका कोसळल्या. १९९१-१९९२ आणि १९९९-२००० या दोन्ही काळांमध्ये अत्यंत धोकादायक व्यवहार करून लोक शेअर बाजारात मोठी कमाई करत होते. 'श्रीमंतांसारखा विचार करा हा हितेन दलालचा १९९९ सालचा मंत्र होता. या दोन्ही घोटाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार खेळणं, नियंत्रकांनी डोळेझाक करणं, आपला आत्मसन्मान राखण्यासाठी टोकाला जाणं, प्रचंड नुकसान होणं आणि शेअर बाजार कोलमडून पडणं अशा अनेक बाबतींमध्ये साम्य दिसून येतं. यातच एकूण व्यवस्थेमधल्या दोषांची करुण कहाणीसुद्धा गुंफलेली आहे... प्रथितयश विदेशी गुंतवणूकदारांच्या मदतीनं एका सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रवर्तकानं व्यावसायिक नीतिमत्तेच्या चिंधड्या उडवत अत्यंत सहजपणे कसा दिवसाढवळ्या दरोडा घातला हे सुद्धा या पुस्तकात आलं आहे. हर्षदला झालेल्या विलक्षण नुकसानामुळे प्रचंड अडचणीत आलेल्या एका बँकेला RBI
नं अत्यंत तत्परतेनं कसं अडचणीतून बाहेर काढलं हे अत्यंत मार्मिकरित्या यात उतरवलं आहे. म्हणून भारतामधल्या उद्योगक्षेत्रातल्या सत्यघटनेवर आधारित असलेलं हे सगळ्यात चित्तथरारक पुस्तक आपल्या संग्रही असलंच पाहिजे. खालील लिंक वर क्लिक करून याची तपशीलवार माहिती मिळवा आणि ह्या पैशांच्या मार्गावरील खाचखळगे जाणून घ्या.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.