सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्गचे पुरस्कार उर्मिला पवार आणि डॉ. श्रीधर पवार यांना जाहीर



कोकण ही जशी आंबा, फणस, चिकू, नारळी, पोफळीची रसरशीत भूमी आहे तशीच ती साहित्यिकांच्या लेखणीला टोकदार करणारी भूमी सुद्धा आहे

मराठी साहित्यातील मुख्य प्रवाह म्हटल्या जाणाऱ्या धारेत कोकणातील अनेक लेखक, कवींचे पाट सुसाटपणे खळाळत धावताना आपण पहिले आहेत. यात आंबेडकरी आणि बौद्ध साहित्यही समांतर वेगाने आज धावते आहे आणि त्याचे कर्तेधर्ते आहेत कोकणचे सुपुत्र . सो. शेवरे. कोकणातील लेखक कवींना हक्काचा विचारमंच मिळवून देणारे . सो. शेवरे हे कोकणातील आंबेडकरी आणि बौद्ध साहित्याचे अध्वर्यू मानले जातात. त्यांच्या हयातीत त्यांनी कोकणातील अनेक साहित्यिकांना घडवलं. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांनीच स्थापन केलेल्या सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग ही संस्था दरवर्षी आंबेडकरी साहित्यिकांचा गौरव करते. यावर्षी हा. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार प्रथितयश आंबेडकरी लेखिका, विचारवंत उर्मिला पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. . सो शेवरे यांच्या सोबतच कोकणातील कवींच्या काव्यप्रतिभेला उजाळा देण्यात उत्तम रत्नू पवार यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या नावेहीउत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्यपुरस्कारदिला जातो. यंदा त्याचे मानकरी ठरले आहेत डॉ. श्रीधर पवार. हा कार्यक्रम २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबईतील दादर पूर्व परिसरातील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर दालनात संध्याकाळी वाजता संपन्न होणार आहे.

कोकणातील आंबेडकरी साहित्याचे अध्वर्यू. आ. सो. शेवरे 


कोकणात अशी साहित्य चळवळ उभी करणं हे तसं सोपं काम नव्हतं. पण दलित पँथरची चळवळ मुंबईच्या आग्रीपाडा विभागात जोमाने चालवणारे आघाडीचे कार्यकर्ते .सो. शेवरे हे दलित पँथरच्या फुटीनंतर निराश झाले, पण ते गप्प बसले नाहीत. मुळात चळवळ अंगात भिनलेली होतीच त्यासाठी कोकणची भूमी त्यांना खुणावत होती. १९८०च्या दरम्यान ते आपल्या भूमीत परतले तेच एका निश्चयाने. दलित पँथरच्या उदयात साहित्याचं योगदान मोठं होतं. हेच आपल्या कार्याचं माध्यम करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि १९८३-८४ मध्ये वाङ्मयीन चळवळ उभी केली. यातूनच त्यांच्याप्रसंवादह्या नियतकालिकाचा जन्म झाला. ‘प्रसंवादमधून ते स्थानिक तरुणांच्या कथांना, लेखांना आणि कवितांना प्रसिद्धी देऊ लागले. यातून अनेक तरुण तरुणींच्या लेखणीला धुमारे फुटले. अनेक लोक त्यांच्या संपर्कात आल्याने याला संस्थात्मक रूप देण्यासाठी त्यांनी १९९०च्या दरम्यान सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग ही संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे अनेक सांस्कृतिक आणि रचनात्मक कामे होऊ लागली. . सो. शेवरे यांच्या कार्यात सहभागी झालेल्या उत्तम रत्नू पवार यांनी सुद्धा कणकवलीत अशीच सांस्कृतिक चळवळ उभी केली. कोकणात साहित्याच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि बौद्ध धम्माचा प्रसार होण्यात आणि एक वैचारिक अधिष्ठान निर्माण करण्यात ह्या दोन महनीय व्यक्तींच्या आणि ह्या संस्थेच्या कार्याचा मोलाचा सहभाग आहे.

राजा ढाले यांना २०१८ साली पुरस्कार प्रदान 




ज. वि. पवार यांना २०१९ साली पुरस्कार प्रदान 


. सो. शेवरे यांनी केवळ सामाजिक, सांस्कृतिक कार्यच केलं  नाही तर हे कार्य पुढे सुरु ठेवणारे कार्यकर्तेही घडवले. हेच कार्यकर्ते आज . सो. शेवरे आणि उत्तम रत्नू पवार यांच्या पश्चात त्यांच्या नावाचे पुरस्कार आंबेडकरी साहित्यिकांना २०१८ पासून ते प्रदान करीत आहेत. २०१८ साली पहिला. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार प्रथितयश लेखक राजा ढाले यांना प्रदान करण्यात आला होता तर २०१९ साली हा पुरस्कार आंबेडकरी लेखक, विचारवंत, भाष्यकार . वि. पवार यांना प्रदान करण्यात आला. त्यांनंतर कोरोनामुळे यात खंड पडला. यावर्षी हा पुरस्कार उर्मिला पवार यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुनील हेतकर यांनी सांगितलं. सुनील हेतकर यांनी पुढे सांगितलं की, “या पुरस्कारासोबतच उत्तम रत्नू पवार यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या नावेउत्तम - सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कारदिला जातो. २०१८ साली कवी अरूण इंगवले यांना त्यांच्याआबूट घेर्यातील सूर्यया काव्यसंग्रहासाठी तर २०१९ साली कवी भूषण रामटेके यांना त्यांच्यामी रांगेतच उभा आहेया काव्य संग्रहासाठी प्रदान करण्यात आला होता. यंदा हा पुरस्कार डॉ. श्रीधर पवार यांना त्यांच्याअर्धे आकाश माथ्यावरह्या काव्य संग्रहासाठी प्रदान करण्यात येणार आहे.”

उर्मिला पवार 


उर्मिला पवार यांनी दोन वर्षापूर्वी वयाची पंचाहत्तरी ओलांडली त्या निमित्ताने त्यांच्या वरील गौरवग्रंथाचे संपादन सोलापूरच्या प्रेरणाभूमी प्रकाशनाच्या धनंजय शांता बळीराम यांनी केले आहे. या कार्यक्रमात त्याचेही प्रकाशन होणार आहे. ह्या गौरवग्रंथाविषयी भावना व्यक्त करताना उर्मिलाताई म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत: आणि घन:श्याम तळवटकर यांच्यासारखे त्यांचे समकालीन साहित्यिकही कोकणातले आहेत पण कोकणात साहित्यिक चळवळ अशी नव्हती. . सो. शेवरे यांनी खेड्यात राहूनच ही चळवळ उभी केली आणि आता त्यांच्या संस्थेचे तरुण कार्यकर्ते हे कार्य पुढे नेत आहेत. यात राजा ढाले, . वि. पवार यांना मिळालेला पुरस्कार मला सुद्धा मिळत आहे याचा मला आनंद आहे. माझा गौरव ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रेरणाभूमी प्रकाशनाच्या धनंजय शांता बळीराम यांचेही आभार. त्यांच्या प्रकाशन संस्थेला दहा वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी उषा अंभोरे यांच्या सांगण्यावरून माझ्या पंचाहत्तरी निमित्ताने गौरव ग्रंथाचा घाट घातला आणि तो त्यांनी पूर्णत्वास नेला आहे. मी आणि माझ्या सोबतच्या अनेकांनी केवळ साहित्य निर्मिती केली नाही तर आम्ही चळवळ उभारली, संघटना बांधल्या, वेळोवेळी रस्त्यावर उतरून सरकारला वंचितांवर होणाऱ्या अत्याचाराचा जाब विचारला, क्रूर कृत्यांचा निषेध नोंदवला, आंदोलने उभारली, गावोगावी जाऊन आम्ही तिथल्या जगण्याचं वास्तव पहिलं. याची नोंद या ग्रंथात यावी अशी अपेक्षा मी प्रकाशकांकडे व्यक्त केली होती आणि त्यांनी हा गौरव ग्रंथ तसाच केला आहे. त्यामुळे हा केवळ माझा गौरव ग्रंथ नाही तर तो चळवळीचा दस्तावेजच ठरेल अशी मला आशा आहे.”     

डॉ. श्रीधर पवार 

 

डॉ. श्रीधर पवार यांनीही त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटलं की, “आजवर माझं अनेक साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यातआरक्षण:भ्रम आणि वास्तवहा एक मुख्य ग्रंथ आहे. कविता मी लिहायचो पण त्या लिहून प्रकाशित कराव्यात असं कधी वाटलं नव्हतं. माझ्यासारख्या अनेक प्रतिभावान कवींना फारसं विचारलंही जात नाही तिथे माझ्या कवितांकडे कोण कशाला बघेल या विचाराने मी कविता लिहिणं बंद केलं होतं. पण माझ्या एका फेलोशिपचा अभ्यास करण्यासाठी मी कामाठीपुऱ्याच्या लालचिमणी दवाखाना इथे प्रॅक्टिस करताना मला तिथे अनेक वेश्यांचं वेदनादायी जीवन जवळून पाहण्याची संधी मिळाली. ते जगणं मी कवितांमध्ये टिपू लागलो. ह्या कविता एकदा नामदेव ढसाळ आणि गो. पु. देशपांडे यांना दाखवल्या, त्या त्यांना आवडल्या. याच दरम्यान एका मुलीने माझ्या कवितांचं हिंदी भाषांतर करून त्यावर एम.फील केलं. पण ह्या कवितांचं पुस्तक नसल्यामुळे तिला एम.फील करताना अडचण येत होती. म्हणून माझ्या कवितांचं गोपाल नायडू यांनी केलेलं हिंदी भाषांतरआधा आसमान सिरपरहा कवितासंग्रह प्रसिद्ध केला. त्यांनतर मी मराठीतअर्धे आकाश माथ्यावरहा मराठी कविता संग्रह प्रकाशित केला. आपल्या आयुष्यातील अर्धं विश्व स्त्रियांनी व्यापलेलं असतं. त्यांच्या जगण्याच्या ह्या कविता आहेत. हा सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग मला देत असलेल्या या पुरस्कारासाठी मी त्यांचा आभारी आहे.”


ह्या कार्यक्रमात सुनील हेतकर यांच्याइस्तवह्या कथासंग्रहाचंही प्रकाशन होणार आहे. ह्या कथासंग्रहाविषयी सुनील हेतकर म्हणाले की, “कोकण रेल्वेत नोकरी करताना मी .सो.शेवरे आणि त्यांच्या संस्थेच्या संपर्कात आलो. “प्रसंवादमध्ये लिहू लागलो. शेवरे यांनी आत्मविश्वास जागवल्यामुळे अनेक अंकांमधून लिहू लागलो. बौद्ध धम्माचं जतन आणि पालन कसं करायचं हे मी माझ्या कथांमधून कोकणातल्या स्थानिक भाषांमध्ये मांडतो. अशाच सर्व कथांचं संकलन हाइस्तवकथासंग्रह आहे. याआधी माझेटेळकाहा कविता संग्रह, ‘थेरीगाथा :स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्वज्ञानहा वैचारिक ग्रंथ असे काही साहित्य प्रकाशित झालं आहे आणि त्याला पुरस्कारही लाभले आहेत.” सुनील हेतकर हे सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्गचे अध्यक्ष तरप्रसंवादचे कार्यकारी संपादक आणिसंथागारह्या त्रैमासिकाचे संपादक आहेत.

उर्मिला पवार आणि डॉ. श्रीधर पवार यांना पुरस्कार प्रदान, उर्मिला पवार गौरव ग्रंथ प्रकाशन आणि सुनील हेतकर यांच्या कथासंग्रह प्रकाशन सोबतच मान्यवरांचे मार्गदर्शन अशी भरघोस वैचारिक पर्वणी असणारासम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्गच्या ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर, प्रमुख अतिथी आहेत आंतराराष्ट्रीय छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे. यासह मोतीराम कटारे, श्यामल गरुड, महेश केळुस्कर आणि डॉ. सोमनाथ कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबईतील दादर पूर्व परिसरातील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर दालनात संध्याकाळी वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती संयोजकांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.