आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक ज. वि.पवार
यांनी लिहिलेल्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र लेखनातील उणीवा"
या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दि. १५ जुलै 2023 म्हणजे ज. वि.पवार यांच्या 78 व्या वाढदिवशी राजगृहात भारतीय बौद्ध महासभेच्या प्रमुख, आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याच वेळी राजगृह परिवाराने ज. वि.
पवार यांचा हृद्य सत्कार केला
या प्रसंगी बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज, दर्शनाताई, मनिषाताई व कृतिका उपस्थित होते.
यानंतर आंबेडकर भवन दादर येथे मा. भीमराव
आंबेडकर यांच्या उपस्थितीत ज. वि. यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
त्यावेळी डॉ.श्रीधर पवार, रतन बनसोडे, सुनीता गायकवाड, छनक शिर्के, आम्रपाली तांबे- सातपुते, दादा डांगळे, शरद मोरे,अंबरसिंग चव्हाण, प्रदीप कांबळे आदी कार्यकर्ते
उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशन आणि त्या पुस्तकावर
संपूर्ण आंबेडकर कुटुंबाच्या म्हणजेच मीराताई आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, दर्शना ताई आंबेडकर, मनिशाताई आंबेडकर या मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर घेण्याचा
अभूतपूर्व क्षण ही याच पुस्तकाने अनुभवाला...
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.