महाराष्ट्रात 4 जिल्ह्यांची अतिउत्तम तर 32 जिल्ह्यांची उत्तम कामगिरी   

कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेत बसून नाही तर घरून ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. सर्व जग थांबलेले असताना ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांचे शिक्षण मात्र थांबले नाही, त्यांचं वर्ष वाया गेलं नाही ही समाधानाची बाब असली तरी यामुळे शैक्षणिक कामगिरीत मात्र मोठी घसरण झाली असल्याचं शिक्षण मंत्रालयाने 9 जुलै रोजी २०२०-21 आणि २०२१-22 ह्या वर्षासाठी केलेल्या पाहणी नंतर जाहीर केलेल्या जिल्हास्तरीय परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सच्या अहवालावरून दिसून येत आहे.    

अशी ठरते जिल्ह्यांची शक्षणिक गुणवत्ता -

या पाहणीत 10 श्रेणीत जिल्ह्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे वर्गीकरण केले जाते. शाळेच्या एकूण 6 विषयांना मिळून ६०० गुणांपैकी जितके गुण मिळतात त्याप्रमाणे शाळेला 10 श्रेणींमध्ये विभागले जाते. परिणाम (निकाल) - २८० गुण, प्रभावी वर्ग व्यवहार - ९० गुण, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क – 51 गुण, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण – 35 गुण, डिजिटल शिक्षण – 50 गुण आणि शासन प्रक्रिया – ८४ गुण हे 6 विषय पुढे आणखी 12 विषयात विभागले जाऊन शैक्षणिक कामगिरीचे मुल्यांकन होते. ते 12 विषय म्हणजे शिकण्याचे परिणाम आणि गुणवत्ता (LO), प्रवेश परिणाम (AO), शिक्षक उपलब्धता आणि व्यावसायिक विकास परिणाम (TAPDO), लर्निंग मॅनेजमेंट (LM), लर्निंग समृद्धी उपक्रम (LEA), पायाभूत सुविधा, विद्यार्थी हक्क (IF&SE), शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण (SS&CP), डिजिटल लर्निंग (DL), निधी अभिसरण आणि युटिलायझेशन (FCV), सीआरसी परफॉर्मन्स वर्धित करणे (CRCP), अटेंडन्स मॉनिटरिंग सिस्टम (AMS) आणि शाळा नेतृत्व विकास (SLD). ह्या विषयांमध्ये जिल्हा स्तरीय शैक्षणिक कामगिरी तपासून त्याप्रमाणे जिल्ह्यांना गुण दिले जातात. ज्या जिल्ह्यात 90% च्या वर गुण मिळवणाऱ्या शाळा आहेत त्यांना ‘दक्ष ही सर्वोच्च श्रेणी दिली जाते. 81%-90% गुण मिळवणाऱ्या जिल्ह्यांना ‘उत्कर्ष’, 71%-80% गुण मिळवणाऱ्या जिल्ह्यांना अति-उत्तम, तसंच 61%-70%, 51%-60%, 41%-50%, 31%-40%, 21% ते 30%, 11% ते 20% असे गुण मिळवणाऱ्या जिल्ह्यांना अनुक्रमे उत्तम, प्रचेस्टा -1, प्रचेस्टा -2, प्रचेस्टा -3, आकांशी-1, आकांशी-2 ह्या श्रेण्या दिल्या जातात 10% पेक्षा कमी गुण मिळालेल्या जिल्ह्यांना आकांशी-3 ही श्रेणी दिली जाते.



आज ९ जुलै २०२३ रोजी जाहीर झालेल्या २०२०-21 आणि २०२१–22 च्या अहवालात एकाही जिल्ह्याला दक्ष आणि उत्कर्ष ह्या दोन अव्वल श्रेणी मिळवता आलेल्या नाहीत. 2020-21 साठी 121 जिल्ह्यांना अति-उत्तम म्हणून श्रेणीबद्ध करण्यात आले, तरीही 2021-22 मध्ये ही संख्या निम्म्याहून कमी होऊन 51 जिल्हे एवढी झाली आहे. २०२० – 21 मध्ये ‘उत्तम’ ह्या श्रेणीत देशातील २७७  जिल्हे होते तर तेच २०२१-22 मध्ये २७० झाले आहत. प्रचेस्टा –1 मध्ये मात्र 2020-21 च्या २२९ जिल्ह्यांमध्ये वाढ होऊन २०२१-22 मध्ये २२९ झाली आहे तर प्रचेस्टा –2 मध्ये 88 जिल्ह्यांमध्ये वाढ होऊन ११७ एवढी संख्या झाली आहे.

महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याला ६०० पैकी ४२२ गुण, मुंबईला ४२४ गुण, नाशिकला ४२२ गुण, सातारा ४३० गुण मिळवून हे चार जिल्हे अति उत्तम तर अहमद नगर, धुळे, पुणे पालघर, ठाणे, बीड, नंदुरबार, मुंबई उपनगर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, जालना, परभणी इत्यादी एकूण 32 जिल्हे ‘उत्तम’ ह्या श्रेणीत आले आहेत. मात्र ‘शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण’ ह्या विषयात महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यांची नोंद ‘दक्ष’ ह्या सर्वोच्च श्रेणीत झाली आहे.    


 

2021-22 साठी 'अति-उत्तम' म्हणून श्रेणीबद्ध करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये गुजरातमधील वलसाड, जुनागड आणि साबर कांठा हे 3 जिल्हे आहेत. तर आंध्र प्रदेशातील चितूर, गुंटूर, विशाखापट्टणम असे 11 जिल्हे ‘उत्तम’ श्रेणीत आहेत. आदिवासी बहुल झारखंड मध्ये 14 जिल्हे प्रचेस्टा -1 श्रेणीत आहेत. तामिळनाडू मध्ये 34 तर ‘उत्तम’ तर उत्तर प्रदेशातील 15 जिल्हे ‘उत्तम’ श्रेणीत आणि तब्बल 56 जिल्हे ‘प्रचेस्टा – 1’ श्रेणीत आहेत.  

अहवालाचा उद्देश -

जिल्हास्तरीय परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सच्या अहवालामुळे राज्य शिक्षण विभागांना शैक्षणिक कामगिरीत जिल्हा स्तरावरील फरक ओळखण्यात आणि विकेंद्रित पद्धतीने त्यांची कामगिरी सुधारण्यास मदत होते. विविध विषयांमध्ये गुण मिळाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला आपण कोणत्या क्षेत्रात अधिक सुधारणा केली पाहिजे याचा विचार करून योजना आखता येतात.

हा अहवाल Unified District Information System for Education Plus (UDISE +) 2020-21, National Achievement Survey (NAS) यांच्या सर्वेक्षणावर आधारलेला आहे.

 

अहवालासाठी लिंक -  https://dpgi.udiseplus.gov.in/