हवामानातील बदलामुळे उष्णतेत झालेल्या वाढीचा सर्वाधिक फटका यावेळी हज यात्रेस गेलेल्या यात्रेकरूंना बसला आहे.
या वर्षी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये १४ जून ते १९ जून २०२४
दरम्यान हज यात्रा पार पडली
मात्र कडाक्याच्या उन्हात सर्व धार्मिक विधी पार पडताना तब्बल ६०० तर ही यात्रा
संपल्या नंतर ९०० जणांनी आपला जीव गमावला. यात ६८ लोक भारतीय असल्याचे सौदी अरेबियाच्या
अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
हज कमिटी ऑफ इंडिया
यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी १३९४२९ भारतीयांनी हज यात्रा
करण्यासाठी सौदी अरेबियाला गेले
होते. यातील अनेक जण वृद्ध असले तरी
त्यांचे आरोग्य उत्तम असल्याचे सांगितले गेले होते. भारतीय हज कमिटी तर्फे
त्यांच्या प्रवासाची आणि राहण्याची उत्तम देखील करण्यात आली होती. मात्र मक्केतील
५१.८ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात आराधना करताना जगभरातून आलेल्या १८ लाख
भाविकांमधील तब्बल ७४५ जणांनी आपले प्राण त्यागले. यात इजिप्त मधील सर्वाधिक
म्हणजे ३२३ यात्रेकरूंचा समावेश आहे तर ६८ भारतीयांचा सुद्धा समावेश होता. शिवाय बुधवारी
यात्रेच्या शेवटच्या दिवशी अराफात पर्वताची आराधना संपन्न झाल्यावर ६ भारतीयांनी या
जगाचा निरोप घेतला. याव्यतिरिक्त, प्रत्येक
देशातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, , इंडोनेशियातील १६५,
जॉर्डनमधील ४१, ट्युनिशियातील ३५ आणि
इराण मधील ११ यात्रेकरून मरण पावले आहेत. अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या सौदी अरेबियाच्या एका अभ्यासानुसार, या भागातील तापमान प्रत्येक दशकात ०.४ अंश सेल्सिअसने वाढत आहे. गेल्या वर्षी या हज यात्रेत २०० हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता, त्यापैकी बहुतेक इंडोनेशियाचे होते.
सौदी नॅशनल सेंटर फॉर
मेटिऑरॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी, मक्का आणि शहरातील आणि आसपासच्या पवित्र स्थळांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसवर (१२५ फॅरेनहाइट) पोहोचले. सैतानाला प्रतीकात्मक दगडमार करण्याचा प्रयत्न
करताना काही लोक बेशुद्ध होऊन पडले. त्यानंतर
हे तापमान वाढून ५१.८ अंश
सेल्सिअसवर पोहोचले.
या यात्रेत अंदाजे २,७००
यात्रेकरू बेपत्ता झाल्याचीही बातमी आहे. यात इजिप्तच्या लोकांची संख्या १,४०० एवढी
आहे. कारण इजिप्तमध्ये व्हिसा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक खटपटी टाळण्यासाठी
अनेक लोक व्हिसा शिवायच मक्केत दाखल झाले होते. यांच्याकडे नोंदणीकृत
ओळखपत्र आणि अधिकृत हज परमिट
नसल्यामुळे त्यांना वातानुकूलित सुविधांमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यांना मिळेल त्या जागी त्यांनी आराम केला
आणि त्यातच काही हरवले तर काहींनी प्राण त्यागले. अशा लोकांना हुडकून काढणे हे इथल्या
कायदा आणि सुव्यवस्थेसमोर एक मोठे आव्हान आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.