जागतिकी कारणाचा परिणाम जसा उद्योग व्यवसायावर झाला आहे तसाच परिणाम आपल्या खानपानाच्या सवयींवर सुद्धा झाला आहे.
अलीकडे अनेक वेगवेगळ्या पदार्थांविषयी आपल्याला ऐकायला मिळतं. तेवढ्या पुरतं आपलं कुतूहल चाळवतं पण नंतर आपण त्याकडे फार लक्ष देत नाही. मात्र सध्या व्यायामाचं महत्त्व वाढीस लागल्यामुळे प्रथिनयुक्त पदार्थ खाण्याचं महत्त्वही अनेकांना पटू लागलं आहे. यात कोणकोणत्या पदार्थात जास्त प्रथिने असतात याचा शोध घेतला असता डाळी, भाज्या आणि तृणधान्यांसह ‘टोफू’ हे नाव बरेचदा ऐकू येतं. सोयाबीनपासून बनवले जाणारे टोफू हे सध्या बऱ्यापैकी लोकप्रिय झाले आहे. शिवाय पनीरला पोषक पर्याय म्हणून सुद्धा त्याकडे पाहिलं जातं.
इसवीसना पूर्वी २०६ ते
इसवीसना नंतर २२० वर्षे या कालावधीत चीनमध्ये असलेल्या हान राजवंशातील राजपुत्र
लिऊ एन यांनी अमरत्वासाठी आहाराचा शोध घेत असताना टोफू बनवण्याची प्रक्रिया शोधली अशी
एक दंतकथा प्रचलित आहे. या कथेची पुष्टी होऊ शकत नसली तरी टोफूचा जन्म चीनचा एवढं
मात्र मान्य केलं जातं. त्यानंतर बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ संपूर्ण आशिया खंडात
फिरणाऱ्या बौद्ध भिक्खूंमुळे हा पदार्थ आधी नारा या जपानी साम्राज्यात पोहोचला मग
तिथून इंडोनेशिया, कोरिया आणि संपूर्ण पूर्व आशियात पोहोचला. भारतात येण्यासाठी
मात्र त्याला जागतिकीकरणाच्या काळाची म्हणजे १९८० – ९० या काळाची वाट पहावी लागली.
परदेशात गेलेल्या विशेष करून शाकाहारी लोकांना या टोफुची महती कळली आणि टोफुने भारतात आपले पाय
रोवायला सुरुवात केली. आज टोफू ग्रामीण भागात नाही पण शहरी भागातील प्रामुख्याने
मॉल्स आणि दुकानांमध्ये दिसतात.
टोफू अनेक बाबतीत
पौष्टिक आहे. यात मोठ्या प्रमाणावर वनस्पतीजन्य प्रथिने तर आहेतच शिवाय यातून कमी
कॅलरीज मिळत असल्याने आणि यात चरबी सुद्धा कमी असल्याने वाढणाऱ्या वजनाला
नियंत्रित ठेवता येतं. शिवाय यात अमिनो आम्ल, लोह, कॅल्शियम आणि इतर्ल खनिज द्रव्य
भरपूर प्रमाणात असतात.
टोफूतील लो सॅच्युरेटेड
फॅट्समुळे हृद्य रोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो. यातील कॅल्शियममुळे हाडांची सुदृढता
कायम राहते. टोफूमध्ये आयसोफ्लाव्होन
असतात, ज्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात आणि ते
जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. या कारणांमुळे व्यायाम करणाऱ्यांमध्ये टोफू
लोकप्रिय झाला आहे. व्यायाम करणाऱ्यांमध्ये स्नायू रप्चर होतात म्हणजे स्नायूंची
हानी होते. ही हानी भरून काढण्यासाठी टोफू उत्तम पर्याय आहे.
टोफू बनवण्याची पद्धत
पनीरप्रमाणेच आहे. पनीर जसं फाटलेल्या दुधापासून बनवलं जातं तसंच टोफूसाठी सोयाबीन
पाण्यात भिजवून नंतर त्याला विशिष्ट वेळेपर्यंत उकळवून त्यापासून सोय दूध तयार
केलं जातं. हे दुध लिंबू पिळून फाटून
घेतलं जातं. कापडात बांधून, पिळून त्यातून सर्व पाणी काढून टाकलं जातं. कापडात जे
उरेल ते असतं टोफू.
टोफुपासून विविध
पदार्थ केले जातात. म्हणजे सूप, आईसक्रिम, स्मुदीजमध्ये हे वापरलं जातं. पनीर
ज्याप्रमाणे नुसते तळून किंवा त्याची भाजी बनवून खाल्ली जाते अगदी तसं टोफू बनवता
येईल. टोफू खा आणि मस्त राहा. कारण हा टोफू आहारातील प्रथिने आणि कॅल्शियमची तोफ
आहे, तोफ!
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.