सनदी लेखपाल अंबर दलाल |
सनदी लेखपाल अंबर दलालने एका अभिनेत्यासह केली २००९ जणांची फसवणूक
मुंबई : एक दोन नाही तर तब्बल २००९ जणांची अकराशे कोटी रुपयांची फसवणूक
करणाऱ्या सीए अंबर दलाल याच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले
आहे. शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी दाखल झालेले हे आरोपपत्र ४४ पानांचे आहे, असून
गुंतवणूक करा आणि चांगला परतावा मिळवा
असे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये
देशातील अभिनेते अन्नू कपूर
यांच्यासह अनेक भारतीय आणि अमेरिका,
दुबईतील अनिवासी भारतीयांचाही समावेश आहे.
जुहू येथील फॅशन
डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी
गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे एप्रिल २०२३ मध्ये मुख्य तक्रारदार मलकानी यांची एका मैत्रिणीने
त्यांची आरोपी
अंबर दलालशी ओळख करून दिली होती. त्याने त्यांना गुंतवणुकीवर आकर्षक नफा देऊ केला.
तसेच प्रत्येक महिन्याला १.५ ते १.८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले.
तक्रारदार महिलेने गुंतवणूक केली आणि तिला वचन दिलेले परतावे मिळाल्यावर तिने आणखी
गुंतवणूक केली. मात्र यानंतर मार्च
२०२४ मध्ये अंबर दलाल गुंतवणुकीचे पैसे घेऊन फरार झाला. १४ मार्च २०२४ रोजी
त्याच्या कुटुंबियांना विचारले असता त्यांनाही त्याचा ठावठिकाणा माहित नव्हता.
तेव्हा पोलिसांनी १५ मार्च
रोजी रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक अंबर दलाल
यांच्याविरुद्ध सुरुवातीला किमान
१२ गुंतवणुकदारांची ५४ कोटी रुपयांची
फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण
प्रकाशात आल्यावर या सापळ्यात अडकलेल्या लोकांनी तक्रार करण्यास सुरुवात केली आणि तक्रारदारांची संख्या वाढून आता २००९
झाली. या सर्वांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आपल्या
तक्रारी दाखल केल्या आहेत. अंबर दलाल याने या सर्वांची एकूण ११०० कोटी रुपयांची फसवणूक केली
आहे.
१२ दिवस फरार असताना अंबर दलाल भारतातील अनेक राज्यातील अनेक हॉटेल्समध्ये राहिला. अखेर २६ मार्च २०२४ रोजी
उत्तराखंडची राजधानी डेहराडून इथून अटक करण्यात आली.
याप्रकरणी आरोपी
दलालच्या मालमत्तांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने माहिती घेतली असून आतापर्यंत
अंबर दलालच्या १७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर आर्थिक गुन्हे शाखेने टाच आणली आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.