3 April 2025 : US Market : 

चीन आणि इतर आशियाई देशांमध्ये आपली उपकरणे उत्पादीत करणारी आयफोन निर्माता कंपनी अॅीपल २०२० नंतरच्या सर्वात मोठ्या घसरणीकडे वाटचाल करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर व्यापार कर लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा अमेरिकन बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या व्यापर कराचा त्यांच्या शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला असून, आज अमेरिकन बाजार उघडताच एस अँड पी ५०० निर्देशांकातील अंदाजे १.७ ट्रिलियन डॉलर्सचा चुराडा झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार कर लादण्याच्या घोषणेमुळे आर्थिक मंदीची भीती वाढल्याने अमेरिकेच्या शेअर बाजारात ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान बाजारातील या घसरणीचा सर्वाधिक फटका अशा कंपन्यांना बसला आहे, ज्या परदेशी उत्पादनांवर अवलंबून आहेत. अमेरिकेत विक्री होणाऱ्या बहुतेक उपकरणांचे उत्पादन चीनमध्ये करणाऱ्या अॅ पल इंकच्या शेअर्समध्ये ८% घट झाली आहे. तर, व्हिएतनामध्ये उत्पादन होणाऱ्या लुलुलेमॉन अॅअथलेटिका आणि नाईकीच्या शेअर्समध्ये सुमारे १०% घसरण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे २०२२ नंतर पहिल्यांदाच अमेरिकन बाजाराच्या बेंचमार्क निर्देशांकात सर्वात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. न्यू यॉर्कमध्ये सकाळी (गुरूवारी) ९.३५ वाजेपर्यंत, एस अँड पी ५०० निर्देशांकातील कंपन्यांपैकी सुमारे ७०% कंपन्यांनी तोटा सहन करावा लागला, जवळजवळ निम्म्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २% किंवा त्याहून अधिक घसरण झाली आहे.

दरम्यान अमेरिकन बाजारातील नॅस्डॅक कंपोझिटमध्ये आज सर्वाधिक ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे तर एस अँड पी ५०० मध्ये ३.७ टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अमेरिकन बाजारातील महत्वाचा निर्देशांक डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी ३ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. त्यामध्ये सुमारे ११०० अंकांची घसरण झाली आहे.

चीन आणि इतर आशियाई देशांमध्ये आपली उपकरणे उत्पादीत करणारी आयफोन निर्माता कंपनी अॅनपल २०२० नंतरच्या सर्वात मोठ्या घसरणीकडे वाटचाल करत आहे. कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. याचबरोबर इतर टेक कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून येत आहे.