पर्यटनासाठी गेली असता बसवर दरड कोसळली: एकूण तीन मृत्युमुखी
हिमाचल प्रदेशात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर, भूस्खलनाच्या घटना सुरूच आहेत. शिमल्यामध्ये पर्यटकांच्या बसवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील महिलेसह दोन पर्यकांचा मृत्यू झाला असून १५ पर्यटक जखमी झाले आहेत. लक्ष्मी विराणी असे मयत महिला पर्यटकांचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
लक्ष्मी ही कंपनीतील सहकाऱ्यांसह हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेली होती. यादरम्यान शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यात हिंदुस्थान-तिबेट मार्गावरील बिथल परिसरात मुसळधार पावसामुळे त्यांच्या बसवर दरड कोसळली. यात लक्ष्मीसह दोघांचा मृत्यू झाला. लक्ष्मीचा मृतदेह रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर लक्ष्मीचा मृतदेह तिचे सहकारी तरुण रामचंदानी यांच्या ताब्यात देण्यात येईल. जखमींना उपचारासाठी रामपूरच्या खानरी येथील महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्रात दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासन आणि हिमाचल प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधला आहे. कागदपत्रांची पूर्तता करून लक्ष्मीचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.