पुणे : वृत्तसंस्था
पुणे रेल्वे स्थानकावरील
वाढता ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी
शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत मोठा दिशा-निर्देश दिला. त्यांनी हडपसर आणि खडकी रेल्वे स्थानकांना ‘सपोर्टिंग
हब’ म्हणून विकसित केल्याशिवाय पुणे स्थानकाचा भार कमी होणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले.
गोस्वामी यांनी सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकावर दक्षिणोत्तर रेल्वे
मार्गावरून चालणाऱ्या गाड्यांचे स्थलांतर ही प्राथमिक योजना आहे. या बदलामुळे
मुख्य स्थानकावरील ताण कमी होऊन व्यवस्थापन अधिक सुकर होईल. त्यानंतरच पुणे रेल्वे
स्थानकाचे फलाटांचे विस्तारीकरण आणि आवडीच्या सुविधा वाढविण्याचे काम वेगाने सुरू
होईल.
स्थानकांची पुनर्बांधणी आणि सुविधा
पुणे विभागांतर्गत
दौंड–लोणावळा रेल्वे मार्गावर ‘क्रू लॉबी’, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, आधुनिक सुविधा असलेली
इमारत, प्रशिक्षण केंद्र, सोलर पॅनल,
इलेक्ट्रिक लोको शेड आणि तपासणी वाहन सुविधा यांसारख्या प्रकल्पांची
अंमलबजावणी केली जात आहे. गोस्वामी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीही
केली आहे.
ते म्हणाले की, हडपसर, खडकी, केडगाव, दौंड, चिंचवड आणि संगम
पूल या ठिकाणी चालू असलेले विकासकाम जवळपास पूर्ण होत आहेत. या स्थानकांवरून
गाड्यांचे संचालन सुरू झाल्यावर पुणे स्टेशनवरील भार लक्षणीयरीत्या कमी होईल.
त्यामुळे गर्दीचे नियोजन, गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्यास
आणि एकंदर व्यवस्थापनाला मदत मिळेल.
स्थानक क्षमता व विस्तारीकरण
गोस्वामी यांनी स्पष्ट केले
की, पुणे रेल्वे स्थानकातील सहा फलाटांचे
विस्तारीकरण योजनेचा भाग आहे आणि त्यात पायाभूत सुविधा अत्याधुनिक स्वरूपात असतील.
परंतु, या विस्तारीकरणापूर्वी गाड्यांचे नियोजन आणि स्थलांतर
पूर्ण करणे आवश्यक आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प व भविष्यातील
प्रकल्प
यंदाच्या केंद्रीय
अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे २४,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या तरतुदीत नवीन स्थानके निर्मिती आणि विविध प्रकल्पांचा समावेश आहे. त्याचबरोबर
हडपसर आणि खडकी स्थानकांवरील विकासकाम जवळपास पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच ते
कार्यान्वित होऊ शकतील, अशी आशा गोस्वामी यांनी व्यक्त केली.
अनधिकृत विक्रेते व कायदेशीर कारवाई
पुणे रेल्वे स्थानकात
असणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध वेळोवेळी कारवाई करण्यात येत असून, कायद्याच्या उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध
गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे, असे वर्मा यांनी
सांगितले.
महाव्यवस्थापक प्रतीक
गोस्वामी यांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे
v हडपसर व खडकी स्टेशनवरून गाड्यांचे स्थलांतर केल्याशिवाय
पुणे स्थानकावरील ताण कमी होणार नाही.
v पुणे विभागात आधुनिक सुविधा व पूर्वतयारीसाठी अनेक प्रकल्प
राबविले जात आहेत.
v सध्या पुणे रेल्वे स्थानकाचे सहा फलाटांचे विस्तारीकरण
पुर्णत्वाकडे नेण्यात येत आहे.
v केंद्रीय अर्थसंकल्पात २४,००० कोटी रुपयांची रेल्वे प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
v अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.

0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.