११ ऑक्टोबर २०२०

हाथरस बलात्कार प्रकरणात चंदपा पोलीस स्टेशनमध्ये नोंद केलेली एफआयआर रविवार दि. १० ऑक्टोबर २०२० रोजी सीबीआय ने त्यांच्या गाजियाबाद येथील शाखेत नोंदवली. रात्री उशिरा गावात पोहोचलेलल्या सीबीआयच्या टीमने स्थानिक प्रशासनाकडून सर्व कागदपत्रं आपल्या ताब्यात घेऊन प्रकरणाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. सीबीआयने चार आरोपींच्या विरोधात सामूहिक दुष्कृत्य आणि हत्येची कलमे लावून तक्रार नोंदवली आहे.     

या प्रकरणाचा तपास आतापर्यंत एसआयटी करीत होती. त्यांनी हा तपास पूर्ण करण्यासाठी आणखी १० दिवसांचा अवधी मागून घेतला होता. मात्र हाथरस मध्ये जातीय विद्वेष पसरून दंगल घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न होता असं दिसून आल्यावर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आधी पासून हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासाठी आग्रही होते. मात्र मुलीचे शव रातोरात जाळून टाकून पुरावेच नष्ट केल्यामुळे आता सीबीआय चौकशीची नौटंकी कशासाठी असा प्रश्न योगी सरकारला विचारला जात आहे.