ऑक्सिजन निर्माण करणारं उपकरण : Mars Oxygen In-Situ ResourceUtilization Experiment - MOXIE |
भारतात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना इथे प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनच्या अभावी रुग्ण प्राण सोडत असतानाच पृथ्वीपासून तब्बल २९ कोटी ३४ लाख कोटी मैल दूर असलेल्या मंगळ ग्रहावर मात्र ऑक्सिजन तयार करण्यात आला आहे. अर्थात या ऑक्सिजनचा सध्याच्या कोविड रुग्णांना काही फायदा होणार नसला तरी ही भविष्यातील अवकाश संशोधनाला मिळालेली संजीवनी आहे एवढं मात्र नक्की.
नासाचे प्रीजर्वरंस हे मंगळ यान १८ फेब्रुवारी २०२१ रोजी मंगळ ग्रहावर उतरलं. तेंव्हापासून केवळ ६० दिवसाच्या आत प्रीजर्वरंसने दोनदा आपल्या संशोधनात यश मिळवलं. एक १९ एप्रिलला इंजेन्यूइटी हे हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागावर उडवलं तर काल २२ एप्रिलला मंगळाच्या वातावरणातील पातळ थराच्या कार्बन डायॉक्साईड वायूमधून ऑक्सिजन बनवला. प्रीजर्वरंस या यानासोबत असलेल्या Mars Oxygen In-Situ Resource Utilization
Experiment म्हणजेच MOXIE या टोस्टर एवढ्या लहान यंत्राने हा ऑक्सिजन बनवला.
कोणत्याही अवकाश संशोधनात प्रत्यक्ष परग्रहावर संशोधन करण्यासाठी मानव, रॉकेट आणि इतर उपकरणांसाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत असतो. आता मंगळावर तिथल्या वातावरणातील वातुपासून ऑक्सिजन बनवला गेल्याने भविष्यात अनेक अवकाश मोहिमांची आखणी करणं नासा संशोधकांना सोपं होणार यात काही शंका नाही.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.