जगात असंख्य स्त्रिया असतील ज्यांना त्यांच्यासाठी समर्पित हा जागतिक महिला दिन माहीतही नसेल. पण त्यांच्याच कणखर बाण्यावर आणि तितक्याच अवखळ वृत्ती आम्ही इथे कविता करून आमचा जागतिक महिला दिन साजरा करत असतो. मीही काही वेगळी नाही. आणि मला वेगळी व्हायचंही नाही. कारण मला त्यांच्या ऋणात राहायचे आहे. त्या जे करतात त्यांना माहितही नाही की दूर कुठेतरी त्यांच्या कामाचा परिणाम कीबोर्ड सटासटा बोटं चालवून आपली मान मोडून काम करणाऱ्या बाईला ती शेतावर राबणारी स्त्री आपली खरी आदर्श वाटत असेल. ती असेल तिच्या कामात दंग आणि मी मात्र तिचे फोटो गुगल वरून सर्च करून त्याचे पोस्ट बनवण्यात व्यस्त. कारण मला तिला माझ्या वाकड्या तिकड्या शब्दात सांगायचं आहे की तू खरंच ग्रेट आहेस.तू खरंच उर्जेचा स्त्रोत आहेस. तू मूळ आहे. तू ओरिजिनल आहेस. तू मातीतली आहेस. तू त्या जातीच्या आखाड्यात राहून सुद्धा पुरुषांनी आखून दिलेल्या आखाड्यात किती वेगळी आहेस. आणि तुला त्याचं भान आहे ही केवढी मोठी गोष्ट. 

 

फार लिहित नाही. हा जागतिक महिला दिन तुला आणि तुझ्या सारख्या अनंत मावश्यांना समर्पित. ती दाण्यांची पखरण समस्त जगावर तू सतत करत रहावीस यासाठी तुला मनभरून शुभेच्छा!