कुटुंबासाठी सुविचार :
Quotes and design by Nakshi |
आपल्या सर्वांच्याच
कुटुंबात अशा काही व्यक्ती असतात ज्यांना आपण किती चांगले आहोत आणि कुटुंबासाठी
किती केलं आहे हे सतत ठसवण्याची सवय असते. ते कोणत्याच गोष्टीला अगदी सहज असं घेत
नाहीत. त्यात कुठे ना कुठे तरी आपल्या मोठेपणाचा आव असतोच. काही अंशी हे खरं असतं
की त्यांनी कुटुंबासाठी काही गोष्टी केल्या असतील ज्या इतराना शक्य झाल्या नसतील.
पण त्यासाठी त्यांची परिस्थिती सुद्धा तितकीच कारणीभूत असते. इतरांना कोणाला मदत
करावीशी वाटली तरी कधी आर्थिक तर कधी ‘माझी मदत त्यांना आवडेल का?’ या विचाराने ते
कधीच पुढाकार घेत नाहीत. याचा अर्थ असा
होत नाही की ते कुटुंबासाठी काहीच करत नाहीत. कदाचित मदत करणाऱ्या माणसाचं नाव
त्यांनीच सुचावालेलं असू शकतं. पण मदत करणाऱ्या माणसाला याची जाणीव नसते आणि त्याने
मदत केली याचा अर्थ आता त्याने नेहमी आपल्याला वचकूनच राहिलं पाहिजे असा त्यांचा
ग्रह होतो. यातून मग जेव्हा जिला मदत केली आहे ती व्यक्ती थोडी जरी नाकावर जड होऊ
लागली की मदत करणाऱ्या व्यक्तीला ती नकोशी होते आणि ती आपली टिमकी वाजवू लागते. पण
त्या व्यक्तीने नेमकं काय केलं आहे, किती केलं आहे आणि ती किती बोलून दाखवते हे
याची जाणीव फक्त मदत घेतलेल्या नाही तर इतरांनाही व्यवस्थित समजत असते. यामुळे ती
मदत करणारी व्यक्ती तिच्या मदतीने निर्माण केलेला आदर पुसून टाकते. म्हणून आपण कधी
कोणाला मदत केली असेल तर ती वारंवार बोलून दाखवू नये. मदत अशी करावी डाव्या हाताचं
उजव्या हाताला कळू नये.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.