ही गोंडस आणि अलिशान शाल आहे काश्मिरचं सौंदर्य आणि आरी एम्ब्रोयडरीची मनोरम तितकीच समृद्ध कला अधोरेखित करणारी पश्मीना शाल.
येणाऱ्या हिवाळ्यासाठी आपल्याकडे सुद्धा एक उबदार, नक्षीदार आणि कोणत्याही ड्रेस वर स्टोल प्रमाणे वापरता येईल अशी एक शाल असावी, आपल्या वयोवृद्ध पालकांना द्यावी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला वाढदिवासाची भेट द्यावी असं वाटत असेल तर ही शाल एक सुंदर पर्याय ठरू शकेल. ‘पश्मोडा’ ह्या कंपनीने वितरीत केलेली ही शाल आणि तिच्या प्रमाणे अनेक कंपनी आणि डिझाईन्सच्या शाली Amezon.in वर उपलब्ध आहेत.
ह्या लिंक वर किंवा फेसबुकच्या
ह्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ह्या सहलीचे सर्व तपशील पाहू शकता.
तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही आणि कोणत्याही रंगाची शाल विकत घेऊ शकता. संध्याकाळच्या एखाद्या पार्टीत नुसती खांद्यावर टाकून मिरवू शकता आणि बोचणाऱ्या थंडीला गुलाबी थंडीत बदलू शकता.
अगर फिरदौस बर रू-ए जमीं अस्त,
हमीं अस्त-ओ,
हमीं अस्त-ओ,
हमीं अस्त-ओ....
अमीर खुस्रोच्या या ओळी काश्मीर विषयीच्या ममत्वाची अगदी अंतस्थ भावना मनोमन व्यक्त करतात. हे सर्वांग सुंदर काश्मीर गेली अनेक दशके कोणकोणत्या दिव्यातून जात आहे हे आपल्याला माहीतच आहे. नेहमी दहशतवादाच्या सावटाखाली राहणाऱ्या इथल्या जनतेचं जिणं जसं दुस्तर झालंय तसंच ह्या सर्व रणधुमाळीत इथली कलाकुसर सुद्धा शेवटची घटका मोजत आहे. ही कला आहे काश्मिरी पश्मीना शाल तयार करण्याची आणि तिच्यावर केल्या जाणाऱ्या अत्यंत मोहक भरतकामाची. ह्यालाच आरी एम्ब्रोयडरी म्हणतात.
आरी एम्ब्रोयडरीने शोभिवंत बनलेली काश्मिरी पश्मीना शाल सर्व जगात प्रसिद्ध आहे. मात्र काश्मीरचाच नाही तर संपूर्ण देशाचा अभिमान असलेली ही काश्मिरी पश्मीना शाल मात्र राजकारणाच्या दोरखंडांनी जखडली गेली आहे. तिची मोहक रंगसंगती आणि नक्षीकाम अजूनही तमाम चाहत्यांना भुरळ पडत असली तरी तिच्या विक्रीवर विपरीत परिणाम होऊन हाताने भरतकाम करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे इथले जुने जाणते कलाकार ही कला आपल्या कफल्लक स्थितीतही जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे तरुण मंडळी मात्र आता या कलेकडे फार आदराने पहात नाहीत. ह्या कलेत परतावा नाही त्यामुळे हिचा व्यवसाय उभा रहात नाही. जी कला तुम्हाला उपाशी ठेवते ती कला स्वत: तर मरतेच पण कलाकारालाही मारते, हे मत इथल्या तरुणांचंच नाही तर ज्यांनी आपली आयुष्ये या कलेला दिली त्या वयोवृद्धांचं सुद्धा आहे.
या कारणासाठीच अनेक स्वयंसेवी संस्थांनी ह्या पश्मीना शाली पारंपारिक पद्धतीने तयार करून त्या विकण्यासाठी प्रदर्शनं भरवली. काही कलाकार आता हे भरतकाम मशीनवर करतात. यामुळे त्या शालीत आत्मा रहात रहात नाही असं म्हणतात. पण या मशीनमुळेच कलाकारांना जास्त शाली बनवता येतात आणि अनेक संस्थांना जास्तीत जास्त पश्मीना शाली प्रदर्शनात आणून त्या विकता येतात हे ही तितकंच खरं.
आरी एम्ब्रोयडरी जरी मशीनने होत असली तरी पश्मीना शालीसाठी लोकर मात्र आजही चांग्पा ह्या जातीच्या काश्मिरी मेंढ्यापासूनच घेतली जाते. त्यामुळे ही पश्मीना शाल खूपच उबदार असते. ‘पश्म’चा अर्थच पर्शियन भाषेत लोकर असा होतो. पण काश्मिरी लोक मेंढ्याच्या न कातलेल्या केसांनाच पश्म म्हणतात.
वर दिलेली ही शाल अशीच एक सुंदर पश्मीना शाल आहे. ‘पश्मोडा’ ह्या कंपनीने वितरीत केलेली ही शाल आणि तिच्या प्रमाणे अनेक कंपनी आणि डिझाईन्सच्या शाली Amezon.in वर उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही शाल विकत घेऊ शकता. संध्याकाळच्या एखाद्या पार्टीत नुसती खांद्यावर टाकून मिरवू शकता आणि बोचणाऱ्या थंडीला गुलाबी थंडीत बदलू शकता.
चला... थंडी साजरी करूया....
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.