कसल्या तरी कातळांच्या कपारीत
कुठल्या तरी डोहात साठलेल्या
कोणत्या तरी सदकृत्याची बक्षिसी म्हणून
थेंबे थेंबे सुख पाझरत असतं.
कोणत्या तरी भूतकाळाचा बांध आडवा येतो....
आणि डोह आटतो, कोरडाठाक होतो
आशा अपेक्षांच्या चीरांनी कुढत सुरकुततो
भूत भविष्याच्या गोंधळी तणांनी
सुजलेला दिसू लागतो
उरलं सुरलं भेगाळलेलं अस्तित्व
उरल्या सुरल्या आयुष्यभर मिरवत राहतो

खपली धरलेल्या जखमे सारखा....


==============================================