१४ ऑक्टोबर १९५६ रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित पिडीत समाजाला नवसंजीवनी देण्यासाठी बौद्ध
धम्माची दीक्षा दिली. यात त्यांनी आपल्या समाजाला २२ प्रतिज्ञा दिल्या त्या अशा,
1.
मी
ब्रह्मा, विष्णू, महेश यांना
देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
2.
मी
राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
3.
मी
गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा
त्यांची उपासना करणार नाही.
4.
देवाने
अवतार घेतले, यावर माझा
विश्वास नाही.
5.
गौतम
बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
6.
मी
श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान
करणार नाही.
7.
मी
बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
8.
मी
कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
9.
सर्व
मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
10.मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
11.मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
12.तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
13.मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
14.मी चोरी करणार नाही.
15.मी व्याभिचार करणार नाही.
16.मी खोटे बोलणार नाही.
17.मी दारू पिणार नाही.
18.ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड
घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
19.माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व
नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
20.तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
21.आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.