छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीदापडू घडत आहेत ही आनंदाची अभिमानास्पद बाब आहेत. 

त्यामुळे राज्याच्या नाव लौकिकात भर पडत आहे असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. ते मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संकुलातील पदक विजेत्या यशस्वी खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा प्रामुख्याने गौरव करण्यात आला.



या कार्यक्रमाला आमदार पराग अळवणी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राने, लीना प्रभू, राजू रावळ, मकरंद येडूरकर तसेच संकुलाचे पदाधिकाऱ्यांसह प्रशिक्षक, क्रीडापटू उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून डॉ. रमेश प्रभू यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “डॉ. रमेश प्रभू हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच या क्रीडा संकुलाची उभारणी केली. या क्रीडा संकुलामधून अनके होतकरू खेळाडू निर्माण झाले ज्यांनी राष्ट्रीय वं आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा वं राज्याचा नावलौकिक वाढविला. क्रीडा संकुलातून असे महान खेळाडू तयार होत आहेत. या खेळाडूंना या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य लाभले आहे.” लीना प्रभू यांनी विमानतळ मेट्रो स्थानकास मुंबईचे माजी महापौर तसेच  माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांचे नाव देण्याची तसेच एखादा मुख्य रस्ता किंवा वैद्यकीय महाविद्यालय, उड्डाण पूल, मेट्रो स्थानकास पुष्पा रमेश प्रभू यांचे नाव देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “डॉ. रमेश प्रभू यांचे नाव मेट्रो स्थानकास देण्याबाबत नक्की विचार करू. तसेच या परिसरातील पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील.”

हा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले येथे नुकताच पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलाच्या कर्मचारी वर्गाने फार मेहनत घेतली असे संकुलाच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे.