लेखक - डॉ. प्रमोद ढेरे, निसर्ग उपचार तज्ञ
भारतीय जेवणात ज्या काही पदार्थांना मानाचे स्थान आहे त्यात प्रामुख्याने लसूण येतो.
मसाल्यात स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला फोडणी देण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. लसणाची चटणीसुद्धा बनवली जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी तर खुपच लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
Ø पुरूषांची सेक्स लाईफ - लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढविण्याचा गुण आहेत. हे हार्मोन्स पुरूषांची सेक्स लाईफ सुधारतात. सेक्स पावर वाढते.
Ø हृदयाची मजबूती - लसणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते. यामुळे हृदय मजबूत होते. हृदयविकाराची शक्यता कमी होते.
Ø सर्दी, खोकला, ताप- लसणू खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप दूर होतो. लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल, अँटीबॕक्टेरीयल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे वायरल आजार दूर राहतात. यासाठी लसूण थोडासा भाजून खाऊ शकता.
Ø फिटनेस - फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी एक लसूण पाकळी चावून खा आणि त्यानंतर एक छोटा ग्लास कोमट पाणी प्या. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे दिवसभर ॲक्टिव्ह रहाल आणि फिटनेससुद्धा छान राहील.
Ø पचनक्रिया - पचनक्रिया वाढविण्यासाठी लसूण रामबाण औषध आहे कारण लसणात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९
(अशी आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन ९२ ७१ ६६९ ६६९ या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल)
संजीवनी आर्टलाईफ वेलनेस सेंटरला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.