रस्ता कोणताही असो वाहनाचे नियंत्रण तर आपल्या हातात असतंहे नियंत्रण आपल्या श्वासा इतकं आवश्यक असतंहे लक्षात ठेऊन आपण आपला प्रवास करावातरच सर्वांचा प्रवास सुखकर होईल.


एखाद्या पुलावर जेव्हा अपघात होतो तेव्हा त्यात दोन किंवा अगदी तीन गाड्या सापडू शकतात. पण पुण्यात नवले पुलावर झालेल्या अपघातात तब्बल २४ गाड्यांना नुकसान पोहोचले आहे. यात जीवित हानी झाली नसली तरी जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीम्स अपघातात सापडलेल्या गाड्या आणि लोकांना यातून बाहेर काढलं आहे. ह्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुकीस रस्ता मोकळा करून दिला आहे

हा अपघात नवले पुलावर नऱ्हे जवळच्या परिसरात घडला. या पुलावर नेहमीच खूप ट्राफिक असते. यात गाड्यांमधे अत्यंत कमी अंतर ठेवून वाहतूक सुरु असते. काल साताराहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्याने मागून धडक मारल्यामुळे पुढील २४ गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि त्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. शिवाय या धडकीमुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर तेल गळती होऊन वाहतूक बरच वेळ थांबावावी लागली.

हा नवले पूल आता अपघाताचं केंद बनत चालला आहे. यावर अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. कारण या पुलावर तीव्र उतार आणि वळणे एकत्र आली आहे. या रचनेमुळे हा पूल जीवघेणा बनला आहे

दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत आणि जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.      

नवले पुल आणि त्या पासून काही अंतरावर असलेल्या वडगाव पुल हे एकमेकांना जोडण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुणे महापालिकेला देण्यात आला होता. आता तरी या प्रस्तावा वर विचार होईल अशी आशा करूया.