चीन हा अत्यंत उचापत्या देश आहे हे सत्य आता फक्त तज्ञांनाच नाही तर पोरासोरांनाही कळलं आहे.
अख्ख्या जगाला वेठीस धरणारा
कोरोना सुद्धा चीनच्याच प्रयोगशाळेतून निघाला होता हे माहित नसलेला माणूस सबंध
जगात नसेल. चीनकडे सर्व बाबतीतील अद्ययावत तंत्रज्ञान आहे आणि ह्या तंत्रज्ञानाचा
उपयोग तो जगाचं लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यासाठी पुरेपूर करत असतो शिवाय लोकांची
आवड एनकॅश करण्याच्या अफलातून युक्त्या त्याच्याकडे आहेत. त्यातून जगावेगळ निर्माण
होत असतं हे ही तितकंच खरं! चीनच्या उचापत्या कोरोनाकाळाच्या आधी पासून सुरु आहेत
हे तर आपल्याला माहित आहेच. अशीच एक कृती आज तुम्हाला सांगणार आहे. लोकांना
श्रीमंती झगमगाट आवडतो. त्यामुळे चीनमध्ये असा झगमगाट अनेक ठिकाणी दिसतो. या कृत्रिम
झगमगाटामुळे लोक निसर्गापासून थोडे लांबच गेले आहेत. म्हणून लोकांना या झगमगाटातच
निसर्गाचा आस्वाद देण्याचा किंबहुना त्यांच्या मनात अधिक कुतूहल निर्माण करण्याचा
विडाच जणू चीनने उचलला आहे. असं काय केलंय चीनने? तर शहराच्या मध्यभागी तुम्ही कधी
एखादा धबधबा पहिला आहे का? अहो, पाण्याची पाईपलाईन फुटल्यावर तयार होणारा धबधबा नाही
ओ! खरोखरचा धबधबा. नाही ना. चीनने असा एका इमारतीवरून वाहणारा धबधबा तयार केला
आहे. चीनची ही उचापत विडीयोच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून कोरोना इतकीच जगभर पसरून
‘वायरल’ झाली. आणि ह्या धबधब्याकडे लोक आश्चर्याने पाहू लागले. जितकं याचं कौतुक
होतंय तितकंच यावर टीकाही होते आहे. बघूया या धबधब्याचं पाणी नेमकं कुठे मुरलं आहे
ते.
दक्षिण चीनच्या Guizhou प्रदेशाच्या गुयांग या शहरात Liebian International Plaza आपण या ३९०
फिट म्हणजेच १२१ मीटर गगनचुंबी इमारतीच्या मध्यावरून हा ३५० फिट म्हणजेच जवळपास
१०८ मीटर उंचीचा हा धबधबा जुलै २०१८ मध्ये कोसळू लागला आणि जगाने तोंडात बोटं
घातली. ह्या इमारतीची आणि धबधब्याची संकल्पना आणि डिझाईन Guizhou Ludiya
Property Management ह्या कंपनीने केली आहे. इमारतीच्या बाहेर हा
असा कृत्रिम नजारा तर आतमध्ये अलिशान हॉटेल, शॉपिंग मॉल आणि विविध दुकाने आणि
ऑफिसेस आहेत. हा धबधबा दिसायला अत्यंत सुंदर असता तरी काही लोकांच्या मते इथे पाणी
नाही तर पैसा पाण्यासारखा वाहतो आहे. स्पष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात
पाण्याचा प्रवाह सोडायचा तर त्यासाठी यंत्रणाही तितकीच तगडी लागणार. या
धबधब्याच्या पाण्याचा पुनर्वापर होत असला तरी तो चढवण्यासाठी आणि वाहवण्यासाठी मोठ्या
प्रमाणावर उर्जा लागते. तो खर्च कोणाच्या माथ्यावर येणार! जनतेच्याच ना! पण यावरही
ह्या धबधब्याच्या संचालक मंडळाने उपाय काढला आहे की हा धबधबा खास प्रसंगीच सुरु
करायचा. इतर वेळी इथे दुष्काळ असतो. २०१८ पासून आजवर हा धबधबा फक्त सहा वेळा सुरु
केला गेला आहे. यावरून त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या काळजी आपल्या लक्षात येईल.
हा
धबधबा एक तास जर चालवायचा असेल तर त्यासाठी त्याचा खर्च किमान १०० डॉलर्स इतका
आहे. म्हणजे भारतीय चलनात किमान ८,२६० रुपये इतका. यासाठी वापरल्या जाणाऱ्या
पाण्याला रिसायकल करून पुन्हा वर चढवण्यासाठी चार मोठमोठ्या मोटर्स लागतात. धबधब्या
साठी पावसाचं आणि जमिनीतील पाण्याचा वापर केला जातो. हे पाणी एका विशालकाय टाकीत
जमवलं जातं. धबधब्यातून पडणारं हे पाणी खाली पडताच ते लगेच उच्च क्षमता असणाऱ्या चार
पंपामधून ३५० फिट वर पोहोचवलं जातं. ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाते.
ह्या अजूब्यासाठी चीन सरकारला मोठी किंमत
मोजावी लागत असली तरी हा सुंदर धबधबा बघण्यासाठी लोक लांब लाबून इथे येतात. खरंतर Guizhou प्रदेश Huangguoshu ह्या
धबधब्यासाठी प्रसिद्ध आहेच. त्या प्रसिद्धीत इमारतीवरील हा धबधबा भरच घालत आहे असं
स्थानिकांचं म्हणणं आहे.
चीन्यांनी आपल्याला कृत्रिम फुलांपासून
खेळणी आणि दिवे, कंदील सुद्धा दिले. विविध इलेक्ट्रोनिक्स वस्तू सुद्धा दिल्या. आता
धबधब्याचा हा ट्रेंड सुद्धा सुरु करून दिला आहे. आपल्या देशात जिथे आदिवासी पाडे उखडून,
झाडं जमीनदोस्त करून, मातीची, जमिनीची पर्यायाने पर्यावरणाची अपरिमित हानी करून “द
विलेज” नावाचं अलिशान हॉटेल, मॉल उभारले जातात आणि त्यात कृत्रिम झाडं किंवा
गेला बाजार बोनसाय झाडं (ही सुद्धा जपानी लोकांची देणगी) लावून गावाचा “फील” आणला
जातो, तिथे हे इमारतींवरून कोसळणारे धबधबे
वहायला फार वेळ लागणार नाही. किंबहुना ते कोणत्या तरी गावाची जमीन जबरदस्तीने
बळकावून असा एखादा “प्रोजेक्ट” सुरुही झाला असेल. चीनने दिलेल्या कोरोनानेच
आपल्याला “Back to basics” चा मंत्र दिला. पण अशाप्रकारे बेसिक्सकडे आपण जाणार असू
तर किमान त्यात धसमुसळेपणा न येतां नीट नियोजन असेल एवढी अपेक्षा ठेवूया.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.