Train’D – A regular train traveler and spectator of human behavior.
ट्रेन’डी – ट्रेन मधून प्रवास करताना
आपल्याला अनेक अनुभव येत असतात. खरं तर अनेक लहानमोठ्या प्रसंगांना सामोरं जावं
लागतं. पण एकदा का त्या डब्यातून उतरून घरी परतलो की ते विश्व आपल्या मनोपटलावरून
धूसर होत विरून जातं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या जगात आपण नव्याने शिरतो, पुन्हा नव्या
अनुभवांच्या पुड्या बांधतो आणि घरी जाईपर्यंत त्या सोडून टाकतो. त्यामुळे त्यांची
नोंद होत नाही. माझ्याकडून तरी आजवर झाली नाही. म्हणून मी हे लिहिणार आहे. यात
काव्य अभावानेच आढळेल, त्यामुळे ते शोधायला जाऊ नका. बाकी कमेंट्स सेक्शन आहेच,
कमी अधिक बोलायला. तर फेसबुक आणि माझ्या ब्लॉग itivrutt.com वर. ट्रेन’डी हे शीर्षक ‘ट्रेनमधली धामणकर’ या
अर्थाने दिलं आहे. या विषयीची एक
कविता....
ट्रेन’डीची ओळख
कोणी म्हणेल ट्रेनचं जग ते आहे केवढंसं
पण याच लहान जगात रोज कळून येतात
माणसं....
माणसापेक्षा देवाधर्माला मोठे करणारे इथे
वावरतात
सहज कोणालाही ‘तेरी जात क्या है?’
विचारतात....
अशाच लोकांच्या ह्या आहेत काही कथा
लहान प्रसंगांच्या लहानच व्यथा....
ट्रेन’डीला नाही आस ‘ट्रेन्डी’ होण्याची
आहे फक्त इच्छा अभिव्यक्त होण्याची.....
असेच काही अनुभव आठवले जर तुम्हाला
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.