१ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होणार पहिला अभ्यासक्रम

सध्या सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच अर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र याचे मर्यादित प्रशिक्षण खाजगी स्तरावर दिलं जात होतं. शासकीय स्तरावर ह्या क्षेत्रात पाऊल उचलून महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रज्ञान विभागाने युनिवर्सल बिजिनेस स्कूल या कर्जत स्थित संस्थेला अर्टीफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यासक्रम घेण्यासाठी मान्यता देऊन 25 जानेवारी २०२३ रोजी ह्याचा आरंभ करण्याचे आदेश दिले होते. ह्या आदेशाप्रमाणे हे विद्यापीठ येत्या 1 ऑगस्ट पासून ह्या अर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या अभ्यासक्रमाची सुरुवात करीत आहे.     

युनिवर्सल विद्यापीठाने अर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानावर आधारित पदवीपूर्व, पदवी आणि पदव्योत्तर अभ्यासक्रम तयार केले आहेत. नव्या युगासाठी आधुनिक कला आणि मानवी जीवन, जागतिक घडामोडी आणि व्यवहार, कायदा, पर्यावरण आणि शाश्वतता, क्रीडा विज्ञान यावर आधारित अभ्यासक्रम तयार केले आहेत.



युनिवर्सल विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरू तरुण आनंद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “जग स्वयंचलन आणि डिजिटल व्यवहारात अग्रेसर होत असताना आपला देश ह्या जागतिक अर्थ व्यवस्थेत मागे राहू नये म्हणून ही कृत्रिम बुद्धिमत्ता आवश्यक आहे. भारतचे हे पहिले एआय विद्यापीठ हे जागतिक कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवून देशाच्या विकासला मोठा हातभार लावेल हे नक्की. सोबतच हे एआय विद्यापीठ संशोधनाचं मुख्य केंद्र बनेल ज्यामुळे देशाला आर्थिक आणि तांत्रिक विकास साधण्यास मदतच होईल.”

कर्जात सारख्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ह्या विद्यापीठात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेलू गगनावेरी जाणार हे निश्चित!