तो दगड माझा असेल

जो आकाशाला छिन्न करेल...

ती लाठी माझी असेल

जी समुद्राला दुभंगवेल... 

ती तुतारी माझी असेल

जी अराजकतेचा भंग करेल....

तो डमरू माझा असेल

जो तांडवाची नांदी करेल...

तो नांगर माझा असेल

जो मेंदूंची नांगरणी करेल....

-विनिशा