हे मृत्यो,

तुझ्या मैत्रीचं उबदार पांघरूण मला मिळेल का?

तुझ्या अनंत सहवासाचं गोड आमंत्रण मला मिळेल का?

बोजड कर्जाड डोक्याला निवांत मऊशार उशी मिळेल का?

ज्वालामुखीवर बसलेल्या मनाला हिरवाईचं वरदान मिळेल का?

पाणथळ, चिखलग्रस्त डोळ्यांना आश्वासक बर्फ मिळेल का?

हे मृत्यो,

मलाही तुझी कूस मिळेल का?


- विनिशा