Photo Courtesy - The New York Times

अल-शिफा हॉस्पिटलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आमचे कर्मचारी सक्षम नाहीत असं डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स (मेडिसिन्स सॅन्स फ्रंटियर्स, किंवा एमएसएफ) यांनी म्हटलं आहे. तर इस्रायली हल्ल्यात किमान १२ लोक मारले गेल्यानंतर शेकडो लोक इंडोनेशियन हॉस्पिटलमध्ये अडकले आहेत.

गाझामध्ये रात्रभर इस्रायली हवाई हल्ले सुरूच आहेत, ज्यात अल-बुरेइज कॅम्प, रफाह आणि गाझा सिटी यासह इतर भागातही हल्ले होत आहेत. अल-शिफा रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात ८ अर्भकांचा मृत्यू झाला आहे.

कैरो येथील डब्ल्यूएचओचे अधिकारी रिचर्ड ब्रेनन यांनी सांगितलं की, सोमवारी त्यांनी रुग्णालयातून २८ प्रिमॅच्युअर बाळांना बाहेर काढून इजिप्तला हलवलं आहे. असं असलं तरी अजून ती मुलं भीतीच्या सावटाखाली आहेत. ते लवकरच यातून बाहेर पडतील अशी आम्हाला अशा आहे. पण खूप काळजीपूर्वक त्याचं जतन होणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यात अधिक शारीरिक मानसिक दुर्बलता निर्माण होऊ शकतात. अनेक मुले अनाथ झाली आहे. कारण त्यांच्या पालकांचा शोध लागत नाहीये. जसं जसं लोकांना कळत आहे. लोक येत आहेत. हा मुलांसाठी मोठा दिलासा आहे.”    

Photo Courtesy - The New York Times


ऑक्टोबर २०२३ पासून पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये इस्रायली हल्ल्यांमुळे एकूण ८३ मशिदी नष्ट झाल्या आहेत आणि गाझामधील सरकारी माध्यमांनुसार आणखी १७० मशिदींचे नुकसान झाले आहे.

पॅलेस्टिनींनी इस्रायलवर गाझामधील मशिदींना जाणीवपूर्वक नष्ट करण्यासाठी लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे, तर इस्रायली सैन्याने हमासने हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी मशिदींचा वापर केल्याचा निराधार दावा केला आहे.

हमासचे नेते इस्माइल हनीयेह यांनी टेलीग्रामवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही युद्धविरामावर करार करण्याच्या जवळ आहोत.

Photo Courtesy - Aljzeera

इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत १३,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत. ऑक्टोबर रोजी ओलीस ठेवलेल्या सुमारे २४० इस्रायली नागरिकांची सुटका करण्यासाठी आणि गाझामध्ये युद्धविराम करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वाटाघाटी सुरु आहेत. इस्रायली तुरुंगात असलेल्या महिला आणि मुलांसह काही पॅलेस्टिनींच्या सुटकेवरही चर्चा होत असल्याचे वृत्त आहे.

कतारच्या पंतप्रधानांनी रविवारी सांगितले की, तात्पुरत्या युद्धबंदीच्या बदल्यात काही बंदिवानांना मुक्त करण्याचा करार काही “किरकोळ” व्यावहारिक मुद्द्यांवर अवलंबून आहे.

Photo Courtesy - Aljzeera

सोमवारी, अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांनी बंदिवानांना मुक्त करण्याचा करार लवकरच होईल अशी अशा व्यक्त केली आहे.