खेड्यापाड्यासह शहरातील बुद्धविहारांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम अशा अभ्यासिकांमधून उच्च पदापर्यंत पोहोचलेल्या काही शासकीय अधिकाऱ्यांनी हाती घेतला आहे. त्याला चैत्यभूमीवर विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणी येत असतात. अशावेळी शांतपणे अभ्यास करणे आणि त्यासाठी आवश्यक पुस्तके मिळणे गरजेचे असते. असा प्रत्यक्ष अनुभव गाठीशी असलेल्या जीएसटी विभागातील सहआयुक्त डॉ. प्रशांत रोकडे यांच्या नेतृत्वाखाली 'बुद्धविहार तिथे अभ्यासिका' हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या या उपक्रमाच्या माध्यमातून ६७ अभ्यासिका चालवल्या जातात. त्याचा परिणाम म्हणून हजार विद्यार्थी शासकीय नोकरीत काही विद्यार्थी उद्योजक घडले आहेत.