नमाज पठण करणाऱ्यांसह १०० जणांचा मृत्यू
गाझा पट्टीत सुरु असलेल्या इस्त्रायली हल्ल्यांनी आजवर हजारो निष्पापांचा बळी घेतला आहे. पॅलेस्टाईनची वृत्त संस्था WAFA च्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार १० ऑगस्ट २०२४ रोजी पूर्व गाझापट्टीत विस्थापित लोक रहात असलेल्या एका शाळेला निशाणा बनवून केलेल्या इस्त्रायलच्या हल्लात १०० हून अधिक लोक मारले गेले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला झाला त्यावेळी लोक नमाज पठण करत होते. इस्रायली प्रशासनाने या भागातील पाणी कपात केल्यामुळे गाझा शाळेच्या आगीत अडकलेल्या महिला आणि मुलांपर्यंत बचाव पथकांना पोहोचता आले नाही.
गाझामधून मिळालेल्या
वृत्तानुसार, इमारतीत
सकाळच्या प्रार्थनेसाठी दरज तालुक्यातील
अल तबीन या शाळेत जात असताना या शाळेवर
तीन रॉकेट हल्ले करण्यात आले. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान विस्थापित
झालेल्या लोकांसाठी या शाळेचा निवारा म्हणून वापर केला जात होता, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. या शाळेवर
इस्रायलने शनिवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक जण ठार तर डझनहून अधिक
लोक जखमी झाल्याचा दावा गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने केला आहे.
इस्रायलने शाळेवर
केलेल्या हल्ल्यामुळे शाळेच्या आवारात भीषण आग लागली असून अडकलेल्या पॅलेस्टिनींना
मदत करण्यासाठी बचावकार्य सध्या सुरू आहे. या हल्ल्यादरम्यान काही लोक अगोच्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असल्याचे सांगत स्थानिक
वृत्तसंस्थांनी हा हल्ला भयानक
असल्याचे म्हटले आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि जखमींची सुटका करण्यासाठी
कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे WAFA चे प्रवक्ते महमूद बसाल यांनी सांगितले. इस्रायलच्या लष्कराने गुरुवारी गाझामधील दोन शाळांवर
केलेल्या हल्ल्यात १८ जण ठार झाले होते. त्यावेळी इस्रायली लष्कराने हमासच्या
कमांड सेंटरवर हल्ला केल्याचे सांगितले होते.
गाझाच्या सरकारी मीडिया
कार्यालयाचे प्रमुख इस्माईल अल थवाब्ता यांनी अल जजिरा या वृत्तसंस्थेस सांगितले
की, या शाळेत विस्थापित लोक राहात असल्याचे माहित असूनही इस्त्रायलच्या सैन्याने
तब्बल ९०७ किलो वजनाच्या ३ बॉम्ब्सने हा हल्ला केला आहे.
या शाळेत हमासचे २०
दहशतवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही हा हल्ला केला, अशी माहिती
इस्त्रायलच्या सैन्याने दिली आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.