कर्जत तालुक्यात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने समस्त राज्यात थरकाप उडवला होता. या हत्याकांडाची उकल रायगड पोलीसांना यश आले आहे. दोन भावात असलेल्या मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावानेच आपला भाऊ, त्याची सात महिन्यांची गर्भवती पत्नी आणि १० वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तब्बल ३६ तासांच्या चौकशीनंतर या प्रकरणातील आरोपी हनुमंत जैतु पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
रविवारी सकाळी नेरळ पोलीस
ठाण्याच्या हद्दीतील चिकनपाडा येथे राहणाऱ्या मदन जैतु पाटील (३५), अनिशा मदन पाटील (३०) आणि विनायक मदन पाटील (१०) अशा तिघांचे मृतदेह घराच्या
मागील भागात असलेल्या ओढ्यात आढळून आले होते. तिघांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने
वार केल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे तिघांची हत्या करून त्यांचे मृतदेह नदीपात्रात टाकण्यात
आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तिहेरी हत्याकांडाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांना या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे
निर्देश दिले होते.
नेरळसह, कर्जत आणि खोपोली येथील पोलीस पथकांना या गुन्ह्याच्या
तपासासाठी बोलविण्यात आले होते. तपासा दरम्यान मयत मदन जैतु आणि भाऊ हनुमंत यांच्यात
त्यांच्या घराची जागा
आणि रेशन कार्ड वरील नावे कमी करण्यावरून वाद सुरू असल्याचे समोर आले. यातून हनुमंत
याने मदन आणि त्याची पत्नी यांस मारहाणही केली होती हे देखील काही लोकांनी सांगितले होते.
तिहेरी हत्याकांड घडले त्या
दिवशी हनुमंत आणि त्याची पत्नी घरी नसल्याची बाब समोर आली त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
त्यानी हनुमंत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र तो पोलिसांना उडवा उडवीची आणि वेगवेगळी
महिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर ३६ तासांच्या चौकशी नंतर
त्याने आपल्या कृत्याची कबूली दिली.
मालमत्तेच्या वादातून भाऊ, त्याची गर्भवती पत्नी आणि त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. नंतर तिघांचे
मृतदेह घरामागील ओढ्यात नेऊन टाकले.
आरोपी हनुमंत याने हत्याकांड
करण्यापूर्वी त्याच्या पत्नीला माहेरी पाठवून दिले होते. स्वत: पोशीर येथील चुलत मामाच्या
घरी गणपती असल्याने त्याच्याकडे गेला. आपण त्या
दिवशी मामाकडेच असल्याचे भासवण्यासाठी त्याचे हा बनाव केला होता. मात्र रात्री उशीरा सगळे झोपल्यावर तो मामाच्या घरून बाहेर पडला.
भावाच्या कुटुंबची हत्या करून पुन्हा घरी येऊन झोपला. पण पोशीर ते चिकनपाडा दरम्यान असलेल्या एका
शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्या
रात्रीच्या हालचाली कैद झाल्या होत्या. याबाबत विचारणा करताच त्याने आपल्या कृत्याची कबूली दिली.
हे कृत्य अत्यंत क्रुर
असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ
घार्गे यांनी दि. १० सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.