Petroineos' Grangemouth Oil Refinery Plant |
एकीकडे स्थानिकांचा विरोध डावलून रत्नागिरीच्या बारसूत तेल शुद्धीकरण केंद्र उभारला जात आहे तर दुसरीकडे या तेल निर्मितीत आणि आयातीत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण झाल्यामुळे इंग्लंडमधील १०० वर्षं जुने तेल शुद्धीकरण केंद्र बंद होणार आहे.
स्कॉटलंडमधील ग्रँजमेथ येथील एकमेव तेल शुद्धीकरण कारखाना
पुढील वर्षी उन्हाळ्यात बंद होणार असून इथे काम
करणाऱ्या ४०० कर्मचाऱ्यांवर बेकारी गदा कोसळणार आहे.
हे तेल शुद्धीकरण केंद्र पेट्रोइनोस (Petroineos) या कंपनीचे आहे. पेट्रोचायना इंटरनॅशनल लंडन (PCIL) आणि अब्जाधीश सर जिम रॅटक्लिफ यांनी २०११ साली स्थापन केलेली
ब्रिटिश केमिकल फर्म, INEOS ग्रुप
यांच्या संयुक्त उपक्रमातून ही कंपनी उभी राहिली आहे.
२०११ पासून कंपनीने १.२ बिलियन डॉलर्स गुंतवले आहेत. या ७७५ दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त तोटा झाल्याने कंपनी आर्थिक अडचणींचा सामना
करत असल्याचे ही कंपनी बंद होणार असल्याचे कंपनीकडून प्रसार माध्यमांना सांगितले गेले आहे.
ग्रँजमेथ मधील केंद्र मध्य पूर्व, आशिया आणि आफ्रिकेतील मोठ्या, अधिक
आधुनिक आणि कार्यक्षम केंद्रांशी स्पर्धा करू शकत नाही. त्यांच्या आकारमान आणि भौगोलिक परिस्थितीपुढे
ग्रँजमेथ टिकाव धरू
शकत नाही. आम्हाला दरवर्षी फक्त आमचा परवाना चालू
ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च करावा लागतो, असे कंपनीने सांगितले.
सध्या कंपनीला प्लांट वर दररोज सुमारे ५ लाख डॉलर्स
घालावे लागत आहेत. २०२४च्या अखेरीपर्यंत २०० दशलक्ष डॉलर्सचा तोटा होण्याची अपेक्षा आहे.
पेट्रोइनोस कंपनीने गेल्या
नोव्हेंबरमध्ये ग्रँजमेथ प्रकल्प बंद करण्याचा विचार केला होता, परंतु युनियनच्या नेत्यांनी आशा व्यक्त केली होती की या केंद्रावर काही पर्यावरण पूरक पर्याय स्थापित करण्यासाठी वेळ देता यावा
म्हणून हे केंद्र काही काळ खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कंपनीने म्हटले आहे की या
निर्णयामुळे केंद्राचे स्कॉटलंडमध्ये पेट्रोल, डिझेल, विमान इंधन आणि रॉकेल आयात
करण्यास सक्षम टर्मिनलमध्ये रूपांतरित करून स्कॉटलंडसाठी इंधन पुरवठा करण्यात येईल. परंतु यासाठी सध्याच्या ४७५ कर्मचाऱ्यांपैकी केवळ १०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल.
पेट्रोइनोइस कंपनीने
सांगितले की त्यांना पुढील वर्षी
उन्हाळ्याच्या सुरुवातीस तयार इंधनासाठी नवीन केंद्र उघडण्याची अपेक्षा आहे.
अशी झाली कंपनीची सुरुवात
ग्रँजमेथचा इतिहास १९व्या शतकाच्या
मध्यापासून सुरू होतो. १८५० मध्ये ग्लासगोचे
शास्त्रज्ञ डॉ. जेम्स "पॅराफिन" यंग यांनी 'बिटुमिनस कोळशावर प्रयोग करून त्यातून पॅराफिन मिळवण्यासाठी' पेटंट काढले. १८५१ मध्ये शेल किंवा कोळशापासून तेलाचे उत्पादन करणारे जगातील
पहिले तेलाचे केंद्र बाथगेट येथे उघडण्यात आले.
मात्र अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील जगातील पहिली
तेल विहीर १८५९ मध्ये बुडाली आणि तेलाच्या किंमती कमी झाल्या, ज्यामुळे अनेक स्कॉटिश कामे एकतर बंद झाली नाहीतर वंगण, पॅराफिन मेण आणि अमोनिया सल्फेटचे उत्पादन करण्यावर भर दिला गेला.
यंग्स पॅराफिन लाइट आणि मिनरल
ऑइल कंपनी लिमिटेड या कंपन्यांप्रमाणे तगून
राहण्याचा संघर्ष करणाऱ्या सहा कंपन्या
नव्याने तयार झालेल्या स्कॉटिश ऑइलच्या व्यवस्थापनाखाली १९१९ साली एकत्र आल्या. त्याच वर्षी
स्कॉटिश ऑइल ही कंपनी अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनीने विकत घेतली ज्याचे
नाव नंतर ‘ब्रिटीश पेट्रोलियम’ म्हणजेच ‘बीपी’ असे बदलले.
पूर्वेकडची सपाट जमीन, तेथील दळणवळणातील सहजता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेल तेल शुद्धीकरणात कुशल असलेल्या श्रमिकांची उपलब्धता यामुळे ईशान्य
इंग्लंड ऐवजी ग्रँजमेथजवळ तेल शुद्धीकरण केंद्राची जागा शोधण्यासाठी बीपीला स्कॉटिश ऑइलने राजी केले.
अखेर ग्रँजमेथ येथे १९२४ ला या तेल
शुद्धीकरण केंद्राची स्थापना झाली. या कंपनीने १९३९ पर्यंत दरवर्षी ३,६०,००० टन उत्पादन
घेतले. या वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाल्याने जेव्हा तेलाची आयात कमी झाली तेव्हा ते बंद करण्यास भाग पाडले. दरम्यान तेलाची आवश्यकता वाढल्याने १९४६ साली ते पुन्हा उघडले. या मागणीमुळे कच्च्या तेलाचा पूर्णपणे वापर करणे आर्थिक
कारणांसाठी आवश्यक बनले आणि त्यामुळे पेट्रोकेमिकल उद्योगाची वाढ झाली.
मार्च २००५ मध्ये, हा व्यवसाय चालविण्यासाठी तयार केलेल्या नवीन कंपनीचे नाव
इनोव्हेन होते. २००५ च्या उत्तरार्धात इंग्लंड मधील INEOS ने
BP चा ऑलेफिन (Olefins are chemical compounds made
of carbon and hydrogen atoms that have at least one double bond between carbon
atoms.) आणि डेरिव्हेटिव्ह (A derivative is a financial
instrument whose value is derived from the performance of an underlying asset,
index, or rate.) व्यवसाय विकत घेतला आणि त्यामुळे साइटच्या
इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला.
जुलै २०११ मध्ये, INEOS च्या शुद्धीकरण व्यवसायाने Petrochina सोबत संयुक्त उपक्रम (JV) मध्ये प्रवेश केला आणि
नवीन ‘पेट्रोइनोस’ (Petroineos) या
कंपनीची स्थापना झाली. जी आता ग्रँजमेथ येथील रिफायनरीची मालक आणि संचालक आहे.
कंपनी बंद करण्याचा निर्णय
होईपर्यंत तिने स्कॉटलंडच्या मुख्य
विमानतळांसाठी विमान इंधनाचा प्राथमिक पुरवठादार म्हणून काम केले. तसेच मध्यवर्ती पट्ट्यातील
पेट्रोल आणि डिझेल ग्राउंड इंधनाचा प्रमुख पुरवठादार म्हणूनही तिने काम केले.
हे यूकेच्या एकूण शुद्धीकरण
क्षमतेच्या सुमारे १४ टक्के आहे आणि स्कॉटलंडमधील परिष्कृत तेल उत्पादनांच्या मागणीच्या
जवळजवळ दोन तृतीयांश म्हणजे ६५ टक्के आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.