या वर्षातील आशियातील सर्वात शक्तिशाली वादळ ‘यागी’ आले आणि त्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला.
यात उत्तर व्हिएतनाममध्ये डझनभर लोक मृत्युमुखी
पडले. पायाभूत सुविधा आणि कारखान्यांचे मोठ्या
प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्राथमिक सरकारी अंदाज सोमवारी दर्शविले गेले.
यागी चक्रीवादळाचा तडाखा एवढा
जबरदस्त होता की भूस्खलन आणि आलेल्या महापुरामुळे ३९ लोक मरण पावले आहेत आणि २२ बेपत्ता असल्याचे व्हिएतनामी सरकारने सांगितले.
शनिवारी व्हिएतनामच्या ईशान्य
किनारपट्टीवर यागी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. रविवारी त्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रवेश केला होता.
यागीने लाखो घरे आणि कंपन्यांची
वीज खंडित केली, महामार्गांना पूर आला, दूरसंचार नेटवर्क विस्कळीत केले, एक मध्यम आकाराचा पूल आणि हजारो झाडे पाडली आणि अनेक
औद्योगिक केंद्रांमधील आर्थिक व्यवहार ठप्प झाले.
वीस लाख लोकसंख्येच्या किनाऱ्याल
शहर हायफॉन्गमधील औद्योगिक पार्क आणि कारखान्यांतील व्यवस्थापक आणि कामगारांनी
सोमवारी प्रसार माध्यमांना सांगितले की त्यांच्याकडे वीज नाही आणि अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याने
धातूचे छप्पर
उडून गेल्याने त्यांची उपकरणे वाचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याला तडाखा |
या वादळात हायफुंगमधील एलजी इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याच्या भिंती
कोसळल्या.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स, उपकरणे आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रमुख निर्माता कंपनीने
सांगितले की, त्यांच्या कारखान्यात मोठे नुकसान
झाले आहे. रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन असलेल्या गोदामात पाणी साठले आहे. परंतु इथे कोणतीही
जीवितहानी झाली नाही.
व्हिएतनाममधील दक्षिण कोरियाच्या व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष हाँग सन यांनी किनारपट्टीवरील कोरियन कारखान्यांवर झालेल्या वादळाच्या परिणामाबद्दल विचारले असता ते म्हणाले, “खूप नुकसान झाले आहे.”
सोमवारी फु थो प्रांतातील एक
पूल कोसळला. प्रांताच्या वाहतूक विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "या पुलावरून सतत रहदारी सुरू असते. तो कोसळल्याने दळणवळणावर
परिणाम होण्याची शक्यता आहे.”
हवामान एजन्सीने अधिक पूर आणि
भूस्खलनाचा धोका व्यक्त करून सांगितले होते की ८.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या राजधानी हनोईमध्ये
सोमवारी उशिरा मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्य-चालित वीज पुरवठादार ईवीएन
ने सांगितले की यावेळी ५.७ दशलक्षाहून अधिक ग्राहकांची वीज खंडित झाली कारण डझनभर
वीज वाहिन्या तुटल्या होत्या, परंतु
सुमारे आता ७५ टक्के वीज पूर्ववत करण्यात आली आहे.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.