आदिवासींच्या प्रातिनिधिक जमाती 

टांझानियातील मसाई समुदाय त्यांच्या पारंपारिक वेषात

 

आजपासून जगभरातील आदिवासींची माहिती देण्याचा प्रयत्न सुरु करीत आहे. यात जगात अस्तित्वात असलेल्या आदिवासी जमातींपैकी जास्तीत जास्त जमातींची जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. या लेखात जगभरात असलेल्या काही प्रातिनिधिक जमातींची प्रातिनिधिक माहिती आहे. पुढील लेखांमध्ये सविस्तर माहिती वाचायला मिळेल.

आजच्या तांत्रिक प्रगतीच्या जगात हजारो आदिवासी समुदाय आहेत, ज्यांच्या स्वत:च्या संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली आहेत. सध्या जगभरात अस्तित्वात असलेल्या आदिवासी समुदायांची नेमकी संख्या ठरवणे कठीण आहे कारण त्यांच्या व्याख्या आणि वर्गीकरण हे वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित असते. असं असलं तरी जगभरात सुमारे ५,००० आदिवासी आणि मूनिवासी गट अस्तित्वात आहेत. हे समुदाय मुख्यतः अशा खंडांमध्ये आढळतात जिथे पारंपरिक जीवनशैली संरक्षित राहिली आहे.

भिल समुदाय 


संथाल समुदाय 

आशिया खंडात भारत. इंडोनेशिया, चीन आणि ब्रम्हदेश हे आदिवासी समुदायांचे मुख्य अधिवास आहेत. यात भारतात संथाल, भिल, गोंड आणि नागा आदिवासी हे समुदाय प्रमुख आहेत. तर इंडोनेशियामध्ये दायक आणि दानी लोक हे प्रामुख्याने आढळतात. आशिया व्यतिरिक्त फिलिपिन्समध्ये इगोरोत आणि एइटा; तर आफ्रिकेत आदिवासी समुदायात विविधता आढळून येते ते प्रामुख्याने पशुपालन किंवा शिकारी-संकलक जीवनशैलीशी संबंधित आहेत.


केनिया आणि टांझानियामध्ये मसाई, दक्षिण आफ्रिकेत झुलू, नामिबियात हिम्बा, सॅन किंवा बुशमन, यातील सॅन किंवा बुशमन हे समुदाय बोट्स्वाना आणि दक्षिण आफ्रिकेत सुद्धा आढळतात.

इंडोनेशियातील दानी समुदाय 

मूळ आदिवासी जमाती उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिका या भागांमध्ये विखुरलेल्या आहेत.

यातील प्रमुख जमाती:

·        उत्तर अमेरिका: नवाजो, चेरोकी आणि इनुइट.

·        मध्य अमेरिका: ग्वाटेमाला आणि मेक्सिकोमधील माया समूह.

·        दक्षिण अमेरिका: यानोमामी, ग्वारानी आणि क्येचुआ.

ऑस्ट्रेलियातील टॉरेस स्ट्रेट आयलँडर्स 


ऑस्ट्रेलियातील अबोरिजिनल ऑस्ट्रेलियन आणि टॉरेस स्ट्रेट आयलँडर्स हे मूळ रहिवासी आहेत.

पॅसिफिक बेटांमध्ये माओरी (न्यूझीलंड) आणि विविध पोलीनेशियन आणि मेलानेशियन समुदाय प्रामुख्याने वर्चस्व ठेवतात.

युरोपात मूळ आदिवासी किंवा जमाती समुदाय तुलनेने कमी आढळतात, परंतु स्कँडिनेव्हियामधील स्वीडन, नॉर्वे, फिनलंड आणि रशिया या भागात सामी हे आदिवासी समुदाय आढळतात.