मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. २९ एप्रिल २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती’च्या ‘जनता’ वृत्तपत्राच्या खंड ७, ८, ९ सह इंग्रजी खंड ४ चे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड २ च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन केले.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती’तर्फे जनता खंड ७, ८, ९, ची निर्मिती करण्यात आली आहे. 'जनता' हे वृत्तपत्र आंबेडकर चळवळीचा दस्ताऐवज असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९३० ते १९५६ पर्यंत ते प्रकाशित झाले होते. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनता वृत्तपत्राचे ६ खंड प्रकाशित केले आहेत.
जनता खंडांमध्ये काय असणार -
✅ जनता खंड ७-
१२ फेब्रुवारी १९३८ ते २८ जानेवारी १९३९ पर्यंतच्या एकूण ४८ अंकांचा समावेश
✅ जनता खंड ८-
४ फेब्रुवारी १९३९ ते २७ जानेवारी १९४० पर्यंतच्या एकूण ४८ अंकांचा समावेश
✅ जनता खंड ९-
३ फेब्रुवारी १९४० ते 1 फेब्रुवारी १९४१ पर्यंतच्या एकूण ४८ अंकांचा समावेश
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, विचारवंत आणि दलित पँथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्य सचिव, समितीचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box.